वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- भारतीय कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार ब्रिजभूषण हरियाणातील तत्कालीन क्रीडामंत्री संदीपसिंग आणि फेडरेशनचे काही कोचेस यांच्यावर महिलांच्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविणाऱ्या आणि जगात भारताची शान वाढविणाऱ्या महिला कुस्ती खेळाडूंनी केले आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टाने दखल घेतल्यानंतर बीजभूषण याच्यावर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला असून अद्यापही त्याला अटक केली नाही आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू गेल्या महिनाभरा पासून दिल्लीत आंदोलन करीत आहेत.
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या सर्व महिला खेळाडूंच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी आज पुण्यातील विविध महिला संघटना, सामाजिक संस्था यांच्या वतीने संभाजीमहाराज उद्यान आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवीत महिला खेळाडूंना पाठिंबा दर्शविला या आंदोलनास लोकशाही उत्सव समिती, जनांदोलनाचा राष्ट्रीय समन्वयक (NAPM), स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती, निर्भय बनतो आंदोलन तसेच समविचारी संघटना संस्था त्यांचे कार्यकर्ते, पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सौ. मृणालिनी मदन वाणी महिलाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांनी म्हटले आहे की, देशातील खेळाडूंना आंदोलन करावी लागते हे भारताचे दुर्दैव्य आहे. या खेळाडूंना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही आज पुण्यातील विविध संघटने मार्फत आंदोलन करणाऱ्या खेळाडूंचे समर्थन करतो.

