Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट रेल्वे स्थानकावरील तीन रेल्वे एक्सप्रेस पूर्ववत सुुरू खा.तडस, आ.कुणावार व वर्धा- बल्लारशाह रेल यात्री संघाच्या पाठपुराव्याला यश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 26, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट रेल्वे स्थानकावरील तीन रेल्वे एक्सप्रेस पूर्ववत सुुरू खा.तडस, आ.कुणावार व वर्धा- बल्लारशाह रेल यात्री संघाच्या पाठपुराव्याला यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्हाचे खासदार रामदास तडस यांच्या आक्रमक भूमिकेपुढे रेल्वे प्रशासन नमले असून कोविड काळात बंद झालेले हिंगणघाट रेल्वेस्थानकावरील गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यात आले असल्याने वर्धा – बल्लारशाह रेल यात्री संघाच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

वर्धा-बल्लारशाह यात्री संघाच्या वतीने दि. 12 डिसेंबर 2022 ला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देऊन हिंगनघाट येथे कोरोना काळात बंद झालेले रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत झाले पाहीजे यासाठी खासदार रामदास तडस व आमदार समीर कुणावार यांचेसह वर्धा-बल्लारशाह यात्री संघाच्या डि.के. गुरूनुले, दिलीप बालपांडे, विजय मुथ्था, राजेश कोचर, लिलाधर मडावी, मुन्ना त्रिवेदी, कनक ओस्तवाल, शुभम् त्रिवेदी, बाबुसिंह गहेरवार, रवि जुमडे आदि संघाचे सदस्य दिल्ली येथे निवदेन देऊन, थांब्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली होती. हिंगणघाट येथे कोविड काळात बंद झालेल्या गाड्या सुरू करणे का आवश्यक आहे ? ही बाब सविस्तर समजावून सांगितले. याची दखल सुद्धा रेल्वेमंत्र्यांनी घेतली होती भविष्यात सुद्धा उर्वरित काही गाड्यांचे व नवीन गाड्यांचे थांबे हिंगणघाटला मिळण्याकरता प्रयत्नशील राहू असे, आमदार कुणावर यांनी सांगितले व हिंगणघाट येथे रेल्वे गाड्यांचे थांबे दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

हिंगणघाट रेल्वेस्थानकावर 28 व 29 मे पासून 16031/32 कटरा- अंदमान एक्सप्रेस, 12967/68 चेन्नई-जयपूर एक्सप्रेस व 12511/12 गोरखपुर एक्सप्रेस या गाड्यांना थांबे मिळाले आहे. याकरिता वर्धा बल्लारशाह रेल यात्री संघाने सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. कोविड़ काळात बंद झालेल्या जीटी एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस व दक्षिण एक्सप्रेस या तीन गाड्यांचे थांबे वर्षभरापूर्वी खा. तडस यांच्या प्रयत्नाने सुरू झाले होते. परंतु त्यानंतर उर्वरित गाड्यांना थांबे मिळाले नव्हते. त्यामुळे रेल यात्री संघाने याबाबत खा. तडस व आ. कुणावार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. खा. तडस यांनी आ. कुणावार यांच्या समवेत रेल यात्री संघाच्या पदाधिकार्यांनी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांसोबत भेट घालून दिली. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर हिंगणघाट रेल्वेस्थानकावर बंद गाड्यांचे थांबे देण्याचे आश्वासन दिले. परंतु रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही स्वरूपाच्या हालचाली दिसून येत नव्हत्या. तरीसुद्धा यात्री संघाने आपला पाठपुरावा सोडला नाही.

महिन्याभरापूर्वी खा. तडस हे हिंगणघाट येथे आले असता संघाच्या वतीने त्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला यावेळी तडस यांनी रोखठोक भूमिका घेत जोपर्यंत हिंगणघाट रेल्वेस्थानकावर गाड्यांचे थांबे मिळणार नाही तोपर्यंत हिंगणघाटमध्ये पाय ठेवणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी खा. तडस यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करा, अन्यथा माझा खासदारकीचा राजीनामा आजच घ्या, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे हिंगणघाट वासीयांना मोठा दिलासा मिळाला असून रेल्वेमंत्री, खा. रामदास तडस व आ. समीर कुणावार यांचे वर्धा-बल्लारशाह यात्री संघ यांनी आभार मानले आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

भूतबाधा उतरविण्यासाठी मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत सांगली जिल्हातील 14 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू.

Next Post

जयसिंगपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना रोखण्यासाठी 29 मे ला हल्लाबोल मोर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जयसिंगपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना रोखण्यासाठी 29 मे ला हल्लाबोल मोर्चा.

जयसिंगपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना रोखण्यासाठी 29 मे ला हल्लाबोल मोर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In