पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथे वीज महावितरण कंपनीने कर्मचाऱ्याचा हलगर्जी कारभार समोर आला आहे. वीज वितरण कंपनीच्या या हलगर्जी मुळे दोन चिमुकल्या मुलीच्या जीवावर बितल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
काय आहे घटना: काही मैत्रीणी सोबत सार्वजनिक शौचालय जवळ, जगताप कॉलनी, पिंपळे सौदागर येथे खेळत असताना ती खेळता खेळता इलेक्ट्रिक डि.पी ला असलेल्या तारेच्या कंपाउट मधुन आत जावुन उघडया इलेक्ट्रिक डीपी ला हात लावल्याने तिला शक लागल्याने तिचे उजवे हातापासून मानेला, छातीला, पोटाला इलेक्ट्रिक करंट लागुन त्या चिमुकल्या मूळची अंग मोठ्या प्रमाणात भाजले असल्याची घटना समोर आली. ही घटना वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जी कारभारामुळे घडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
धोकादायक विद्युत डिपी उघडी कशी? विद्युत पुरवठा करणारी धोकादायक डिपी अशा प्रकारे उघडी करून ठेवणे हे अशम्य गुन्हा आहे असे माहित असताना ही वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या धोकादायक असलेल्या विद्युत डिपी कडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे हे करंट लागून 8 वर्षीय चिमुकली भाजल्याचे समोर आले.
याबाबत 27 मे ला आनंद विजयकुमार उमरजकर वय 32 वर्षे धंदा- रिक्षा ड्रायव्हर रा. बुध्दविहार जवळ जगताप कॉलनी, पिंपळे सौदागर, पुणे सांगवी पोलीस स्टेशन येथे हजर राहुन फिर्यादी दिली, 04: 30 वाजताच्या सुमारास माझे राहते घरामध्ये झोपलो असताना मला लहान मुले-मुली मोठयाने नेत्राची आई जोरात ओरडल्याने जाग आली त्यावेळी मी घराचे बाहेर आलो तेव्हा माझ्या ओळखीचे मंधन हे माझ्या मुलीला त्यांचे दोन्ही हातामध्ये ऊचलुन घेऊन जाताना दिसले त्यावेळी मी त्यांचेजवळ जावुन त्यांना काय झाले असे विचारले तेव्हा त्याने मला सांगितले की, तुमची मुलगी व तिची मैत्रीण आकांक्षा जाधव व इतर मैत्रीणी सोबत सार्वजनिक शौचालय जवळ, जगताप कॉलनी, पिंपळे सौदागर येथे खेळत असताना ती खेळत खेळत इलेक्ट्रिक डि.पी.ला असलेल्या तारेच्या कंपाउट मधुन आत जावुन उघडया इलेक्ट्रिक उपकरणाला हात लावल्याने तिला शक लागल्याने तिचे उजवे हातापासून मानेला, छातीला, पोटाला इलेक्ट्रिक करंट लागुन भाजले आहे असे सांगितले. त्यानंतर मी व माझी पत्नी मुलीला घेऊन जिजामाता रुग्णालय पिंपरी येथे गेल्यानंतर त्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांनी आम्हाला पुढील उपचारा करिता वायसीएम रूग्णालय पिंपरी येथे जाण्यास सांगितल्याने आम्ही अम्ब्युलन्स मधुन मुलीला घेऊन वायसीएम रूग्णालय पिंपरी येथे घेऊन गेलो. मुलीची परिस्थिती खूप गंभीर असल्याने त्यानंतर तेथील डॉक्टरांनी मुलीला उपचाराकरिता डीवाय पाटील रूग्णालयात पिंपरी येथे नेण्यास सांगितल्याने मी डीवाय पाटील रूग्णालयात पिंपरी येथे आयसीयु विभागामध्ये उपचारास दाखल केल्यानंतर त्यांनी मुलीला ससुन हास्पिटलमध्ये पुढील उपचारा करिता नेण्यास सांगितल्याने मुलीवर ससुन हस्पिटल येथे उपचार सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे.
राज्य विदयुत वितरण कंपनीतील पिंपळे सौदागर विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी सार्वजनिक शौचालय जवळ येथे इलेक्ट्रिक डि.पी व्यवस्थित तार कंपाउंट न केल्याने तसेच इलेक्ट्रिक डी.पी व्यवस्थित बंद न करता कोणतेही सुरक्षेची काळजी न घेतल्याने माझी मुलंगी नामे- नेत्रा आनंद उमराणीकर वय 08 वर्षे हि इलेक्ट्रिक डि.पी ला असलेल्या तारेच्या कंपाउंट मधुन आत जावुन उघडया इलेक्ट्रिक डीपी ला हात लावल्याने तिला शक लागल्याने तिचे उजवे हातापासुन मानेला, छातीला, पोटाला इलेक्ट्रिक करंट लागुन भाजली आहे.
सौदागर वीज महावितरण विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी सार्वजनिक शौचालय परिसरात डि.पी व्यवस्थित तार कंपाउंट न केल्याने तसेच इलेक्ट्रिक डि.पी च्या सुरक्षे साठी कुठलीही उपयोजना न केल्यामुळे धोकादायक इलेक्ट्रिक डिपी ची व्यवस्थित काळजी न घेतल्याने 8 वर्षीय चिमुकली ला जोरदार इलेक्ट्रिक करंट लागुन भाजण्यास महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीतील पिंपळे सौदागर विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी जबाबदार आसल्याने माझी त्यांच्याविरुध्य कायदेशिर तक्रार आहे.
चिमुकली मोठ्या प्रमाणात भाजली..
इलेक्ट्रिक करंट लागल्याने ही चिमुकली मोठ्या प्रमाणात भाजली आहे. ती रुग्णालयात उपचार घेत आहे. अजून पर्यंत वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या परिवाराला कुठलीही मदत केली नाही.

