पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. २३/०५/२०२३ रोजी तपास पथकातील अंमलदार प्रफुल मोरे, संदिप देवकाते, शेखर खराडे यांना माहिती मिळाली की एक सराईत गुन्हेगार हा शांतीनगर ते चव्हाण चाळ जाणारे रोडवर हातात लोखंडी कोयता घेवून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जावून दहशत करत असून लोक सैरावैरा पळत आहेत अशी बातमी मिळाल्याने त्यांनी लागलीचा ठाणे अधिकारी सुधा चौधरी पोलीस उप निरीक्षक यांना सदर माहिती मा वरिष्ठांच्या आदेशाने तपास पथकातील अंमलदार पोहवा १७२८ चव्हाण, पोहवा २८५७ किर्वे, पोना ७३२२ भोसले, पोना ७४३५ बादरे पोशि ८४४१ देवकाते, पोशि ९०८९ मोरे व पोशि १०२६७ खराडे असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावून सदर सराईत आरोपीस सापळा रचून ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याचे नाव सुलतान ऊर्फ हाफीज महंमद शेख वय २० वर्षे, रा. गल्ली नं १८, सोमजी चौक, बालाजी किराणाजवळ (पीजी) खडीमशीन चौक कोंढवा पुणे असे सांगीतले. त्यास विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे घेवून आलो असता त्याचे ताब्यातून १४ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल, एक लोखंडी कोयता, एक होंडा अॅक्टीवा मोटार सायकल व शिगारेटची पाकीटे असा एकुण १,६०,८९०/- रुपयाचा मुददेमाल हस्तगत केला आहे.सदर आरोपीकडून विमानतळ पोलीस स्टेशन कडील १ गुन्हा, भारती विदयापीठ पोलीस स्टेशन १ गुन्हा, लोणीकंद पोलीस स्टेशन कडील २ गुन्हे, मार्केट यार्ड पोलीस स्टेशन कडील २ गुन्हे, बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील १ गुन्हा असे एकुण ७ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कारवाई मा. श्री रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. शशीकांत बोराटे पोलीस उप-आयुक्त ४, मा. आरती बनसोडे सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग, मा. श्री दत्तात्रय भापकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे मा श्री कविदास जांभळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्रांतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप- निरीक्षक लहु सातपुते तसेच पोलीस अंमलदार दिपक चव्हाण, यशवंत किर्वे, संपत भोसले, संजय बादरे, संदिप देवकाते, प्रफुल मोरे, आणि शेखर खराडे यांच्या पथकाने केली आहे.

