✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे त्यात आता महिला पण या अवैध दारू व्यवसाय करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या अवैध दारू विक्री करणाऱ्या या महिलेच्या या अवैध धंद्याला आशीर्वाद कुणाचा आहे ? याच्या पण छडा पोलिसांनी लावला पाहिजे.
घाटसावली येते दिनांक 02 जून रोजी निर्मलसाई ढाबा येथे अवैधरित्या देशी – विदेशी दारूची विक्री सुरू असल्याबाबत माहिती पोलीस स्टेशन वडनेर चे पोलीस निरीक्षक संजय मिश्रा यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्या बरोबर सदर ढाब्यावर रेड केला असता त्यात मोठ्या प्रमाणात अवैध रित्या विक्रीसाठी ठेवण्यात आली दारू त्यात 1)ऑफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 375 एम.एल.च्या 16 सीलबंद शिश्या किं.9,600 रु 2)गोवा कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 70 शिश्या कि.11,500 रू असा एकुण कि. 21,100/ – रुपयाचा माल मिळून आल्याने सदर माल जप्त करून ढाबा चालक मनिषा जैस्वाल यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन स्टेशन वडनेर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. संजय मिश्रा ठाणेदार वडनेर,पो.उप.नि. चंद्रकांत तावरे, चालक स.फौ गणेश मेश्राम, पो.ना. अजय वानखेडे, म.पो.पवन वानखेडे यांनी मूदेमाल जप्त करून कारवाई केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348-7385445348

