अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- कामगारांसाठी लागू असलेल्या राज्य विमा निगम दवाखाना सुरू आहे. परंतु मोठ्या व गंभीर आजारा करीता कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना नागपूर ला मल्टीस्पेशालिटी ला उपचारासाठी पाठविण्यात येते.अकोल्यात राज्य कर्मचारी विमा निगम योजनेशी एकही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल टाय अप किंवा अटॅच नाही. कामगारांना आरोग्य संबंधित समस्या निर्माण झाल्या तर ते या राज्य कर्मचारी विमा निगम दवाखान्यात जाऊन उपचार घेतात.पंरतु गंभीर आजारी करिता नागपूर येथे जाऊन उपचार घ्यावे लागतात.एखादा रुग्ण जास्त सिरियस असला तर नागपूर पोहचे पर्यंत त्या रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
सध्या कामगार रुग्णांला मोठा त्रास सहन करावा लागतो. म्हणुन उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना व समीर खान राज्य प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंग तुषार वारे मॅडम यांच्या कडे निवेदन देऊन अकोला येथील ज्या हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार होईल.चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, ज्या हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त MD डॉक्टर उपलब्ध असतील असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल टाय अप करावे अशी मागणी केली आहे.

