पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन हादीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगहरोड पो. स्टे पुणे व मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिहगतरोड पोलीस स्टेशन पुणे शहर याचे आदेशाने गुन्हेप्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना, पोलीस नाईक / ५७९१ राजाभाऊ वेगरे, पोलीस नाईक / ७३५१ अमित बोडरे, व पोलीस अंमलदार / ८३४२ अमोल पाटील यांना त्याचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम काळ्या रंगाचा फुल बाहीचा त्यावर पांढल्या रंगाची डिझाईन असलेला शर्ट व फिकट पांढऱ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला इसम हा चव्हाण शाळेजवळ काळुबाई मंदीराशेजारी धायरी पुणे येथे संशयास्पद हालचाली करीत थांबलेला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सपोनि सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी ती मा. वरिष्ठांना कळवुन मा. वरिष्ठांनी खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे आदेशित केल्याने सदर बातमीच्या ठिकाणी जावुन सापळा लावुन मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करता बातमीतील वर्णनाचा इसम सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसले. त्याची व आमची नजरा नजर होताच तो इसम त्या ठिकाणावरुन नजर चुकवून पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यास स्टाफचे मदतीने त्याचा पाठलाग करुन काही अंतरावर दि. १०/०६/२०२३ रोजी २३/३० वा. त्याला शिताफीने पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव तनय गुरुनाथ तोडकर वय २१ वर्षे रा.नरेद्र कॉम्प्लेक्स प्लॅट नं ९ बेनकर वस्ती धायरी पुणे असे सांगितले असता त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे डावे बाजुचे कंबरेस जिन्स पॅन्टच्या आत मध्ये खोसलेले एक ४०,०००/-रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल व १०००/-रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे असा एकुण ४१,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असुन पुढील तपास गणेश मोकाशी, पोलीस उप निरीक्षक, सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. सुहेल शर्मा सोा. मा. पोलीस उपआयुक्त परीमंडळ -३ श्री राजेंद्र गलांडे सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री अभय महाजन सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयंत राजुरकर सोो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश मोकाशी, सहा. पो. फौज. आबा उत्तेकर पोलीस अंमलदार, संजय शिंदे, अमित बोडरे, राजु वेगरे, विकास पांडोळे, विकास बांदल, अमोल पाटील, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, देवा चव्हाण, सागर शेडगे, दक्ष पाटील, स्वप्नील मगर, अविनाश कोंडे, यांचे पथकाने केली.

