संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कामठी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चोर समजून जमावाने तरुणाला गंभीररित्या मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. जमावाने तरुणाला मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र,पोलीस स्टेशनच्या आवारात तो तरुण अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात फुटाणा ओळीमध्ये ही घटना घडली. एका दुचाकीजवळ उभ्या असलेल्या तरुणाला स्थानिकांनी चोर समजून मारहाण सुरू केली. त्यानंतर त्या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, जुनी कामठी पोलीस स्टेशनमध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नासिर ऊर्फ गब्बर होते.
कामठी शहरामध्ये गेले काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळं बाजारात एका दुचाकीजवळ उभ्या असलेल्या अनोळखी तरुणाला पाहून काहींनी त्याला चोर समजले होते. त्यानंतर ही घटना घडली.या तरुणाचा मृत्यू नेमका कशाने झाल्या हे शवविच्छेदन अहवाला नंतर समोर येणार.

