सीमा सुरूशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- वाशिम येथून एक दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे. येथील नागठाण या गावाजवळ चारचाकी व दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात 3 जण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला आहे.
या भीषण अपघातात गणेश भानुदास शिंदे वय 18 वर्ष, दिनकर मारोती गायकवाड वय 26 वर्ष, आकाश जाधव वय 17 वर्ष, सर्व रा. येवती, ता. रिसोड अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर या अपघातात एकलासपूर येथील गोपाल कुलाळ, ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारसाठी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलिस करीत आहेत.

