निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ताडाळी:- आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर तथा राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर येथील समादेशक डॉ. प्रियंका नारनवरे तसेच सहायक समादेशक कृष्णा सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी गावामध्ये मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमांमध्ये ताडाळी गावातील व बचाव पथक यांना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती या विषयावर गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर अचानक उद्भवलेल्या आपत्ती निवारण करण्याकरिता स्थानिक संस्था व स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त उपक्रमाने आपत्ती व्यवस्थापना करीता लागणारे स्टॅंडर्ड डिवाइस व इम्प्रोवाइज डिवाइस चा वापर करण्याचे प्रशिक्षण नॉट चे प्रकार व नॉट बांधण्याचे प्रशिक्षण देऊन संकटाच्या वेळेस क्षमतेनुसार अत्यंत साहसाने व धैर्याने नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती निर्माण झाल्यास मदत कार्य करणे या बाबतचे व्याख्यानाद्वारे, प्रात्यक्षिक द्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे विविध प्रकारचे उदा. सह आपत्ती व्यवस्थापनाचे जनजागृतीची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या प्रशिक्षणाकरिता आपत्ती विषयक प्रशिक्षणा मध्ये पोलीस उपनिरीक्षक यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाबद्दल माहिती दिली. तसेच नैसर्गिक व मानवी आपल्यापासून संरक्षण व व्यवस्थापन करणे वाचविण्याचे विविध प्रकार त्यासाठी लागणारे विकसित व पारंपारिक साधन साहित्याचे उपयोग करणे याबाबतची माहिती दिली.
या कार्यशाळेकरिता ताडाळी ग्रामपंचायतचे सरपंच संगीता पारखी, उपसरपंच निकीलेश चामरे, ग्रामपंचायत सदस्य बबन कसवटे, संजोग अडबाले, ग्रामसचिव, पोलीस पाटील गावातील पट्टीचे पोहोणारे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यशाळेकरिता राज्य प्रतिसाद दल नागपूरचे प्रशिक्षक वर्गामध्ये पोवउपनि ए. यू. उसेंडी आणि रेसक्युअर प्रफुल ठाकरे, ओमप्रकाश चामरे. प्रमोद तिरपुडे, प्रमोद कावडकर, चालक उके यांनी आपत्ती व्यवस्थापनाबद्दल प्रात्यक्षिकासह सखोल माहिती.दिली.

