वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे राज्यात परत एकदा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी यावेळी देशाच्या स्वतंत्र दिनावर, भारतीय राष्ट्रध्वजावर आणि जन गण मन या राष्ट्रगीतावर आपत्तीजनक विधान केले.
15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही, हा काळा दिवस आहे. या दिवशी फाळणी झाली होती, असे संभाजी भिडे म्हणाले. ते इतक्यावरच थांबले नाही त्यांनी भारतीय राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यावर पण आपत्तीजनक टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुण्यातील दिघी येथे रविवारी दिनांक 25 जून रोजी संभाजी भिडेंच्या जाहीर व्याख्यान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा. भारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्विकारला जात नाही, तोपर्यंत शांत बसायंच नमस्कार नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाई सारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल, असे उदगार यावेळी संभाजी भिडे यांनी आपल्या व्याख्यान केले.


किडा पुन्हा वळवळला🤨