उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एक लाचखोर शासकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात लाचखोरीच्या भस्म्यासुर किती फोफावला आहे हे परत एकदा समोर आले आहे.
फायरफायटिंग सिस्टीम बसविल्याच्या कामाचा अंतिम दाखला देण्याच्या मोबदल्यात 1 लाख 25 हजार रुपयांची लाच स्विकारताना महापालिकेच्या प्रभारी मुख्य अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. विजय आनंदराव पवार वय 50 वर्ष, रा. संभाजीनगर, त्रिमुर्ती कॉलनी, सांगली असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टिंबर एरिया येथील अग्नीशमन विभागाच्या कार्यालयात मंगळवारी सापळा लावून ही कारवाई करत बेड्या ठोकल्या आहे.
तक्रारदाराच्या कंपनीकडून फायरफायटिंग सिस्टीम बसविण्याची कामे केली जातात. अशाच एका कामाचा अंतिम दाखला देण्याच्या मोबदल्यात पवार याने दिड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पैसे न दिल्यास कंपनीकडून करण्यात येणाऱ्या पुढील कामाची दाखले देणार नाही असेही पवार याने सांगितले होते. तक्रारत्याला लाच नाही द्यायची होती म्हणून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पवार याने दिड लाख रुपयांची मागणी करत तडजोडीअंती सव्वा लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
लाच मागल्याची खातरजमा केल्या नंतर मंगळवारी टिंबर एरिया येथील अग्नीशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयात सापळा लावून लाचेची सव्वा लाखांची रक्कम स्विकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमा खाली विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
‘लाचलुचपत’चे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अजित पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रविंद्र धुमाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

