समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा भागातील घटना आहे. बसमध्ये 33 प्रवाश्या पैकी 25 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात वर्धा जिल्हातील 14 प्रवाशी प्रवास करत होते.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा परिसरात नागपूर येथील प्रवाशी घेऊन पुण्याला जाणाऱ्या खासगी खाजगी बसला भीषण अपघाताची 25 प्रवासाचा दुःखद मृत्यू झाल्याच्या घटनेन संपूर्ण महाराष्ट्र हादळला आहे. त्यात एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. त्या बस मध्ये नागपुर येथील 7 यवतमाळ येथील 3 तर वर्धा जिल्ह्यातील 14 प्रवाशी प्रवास करत होते. त्यात चार प्रवाशाची ओळख पटली आहे.
या भीषण अपघातग्रस्त बसने वर्धा जिल्ह्यातील 14 प्रवाशी प्रवास करत होते. त्यात चार प्रवाशाची नाव समोर आली आहे. त्यात संजीवनी गोटे अल्लिपुर, राधिका खडसे वर्धा, तेजस पोकळे वर्धा, श्रेया वंजारी वर्धा, तनिषा तायडे वर्धा, प्रथमेश खोडे वर्धा, पंकज रमेशचंद्र हिमाचल प्रदेश वर्धा वरून बसला, करण दुधबावरे झडशी, सुशील खेडकर, पवनार, अवंती जिघणेकर वर्धा, वृषाली वनकर, शोभा वनकर व एक लहान बाळ सर्व वर्धा.
नागपूर येथील प्रवाशी घेऊन पुण्याला जाणाऱ्या खासगी खाजगी बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. खांबाला धडकून उजव्या बाजूच्या संरक्षक कठड्यावर आदळलेली बस आधी डावीकडे पलटी झाली, नंतर काही क्षणातच बसला भीषण आग लागली, या आगीत बसमधून प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांचा होरपळून जाळून कोळसा झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघात 8 प्रवासी थोडक्यात बचावल्याचं समोर आलं आहे. हा अपघात समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा परिसरात झाला आहे. या खाजगी बसमध्ये एकूण 33 नागरिक प्रवास करत होते. यापैकी 25 प्रवाशांचा या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यात वर्धा जील्हातील 14 प्रवाशी प्रवास करत होते. या अपघातात चालकासह आठ जण बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडले. म्हणून त्यांचा जीव वाचला.
या अपघातात 25 प्रवाशाचा मृत्यू झाला असून आता अपघातग्रस्त बसमधील मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी डीएनए टेस्ट शिवाय पर्याय नसल्याचे पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळमधील बहुसंख्य प्रवासी प्रवास करत होते.
अपघात कसा झाला? अपघातग्रस्त बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. बसमध्ये एकूण 33 जण प्रवास करत होते. समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा रोडवर आधी बस एका खांबाला धडकली, नंतर ती उजव्या बाजूला असलेल्या संरक्षक दुभाजकावर आपटली आणि पलटी झाली. बस उलटताच डिझेलच्या टाकीने पेट घेतल्यामुळे काही क्षणातच संपूर्ण बसला आग लागली. रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.ही बस एका बाजूला कोसळल्यामुळे दरवाजा उघडण्याचा मार्ग बंद झाला होता. रात्रीच्या वेळी बसमधील प्रवासी गाढ झोपेत असल्यामुळे अपघातानंतर लगेच समजून बाहेर निघेपर्यंत उशीर झाला होता. जवळपास 25 जणांचा जखमी होऊन, किंवा आगीत होरपळून अथवा धुराने गुदमरुन अंत झाला. ज्या प्रवाशांना संधी मिळाली, त्यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर उडी घेतली.

