नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी मो. नं.7620029220
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जिल्हातील दुर्गापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पहिला दिवस तसेच पहिल्या वर्गात मुलांचा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. प्रवेशोत्सवच्या वेळेस शाळेतून बैलगाडी पूर्ण सजवून पहिला वर्गात दाखल पात्र मुले तसेच शाळेतील इतर मुलांना आणण्याकरिता बैलगाडी रथाप्रमाणे सजवण्यात आली होती. गाडी गावातून प्रत्येक दाखल पात्र मुलांच्या घरी जाऊन त्यांना गाडीत बसवून शाळेत आणण्यात आले. यावेळी गावातील काही मंडळींना शैक्षणिक भजना मार्फत बैलगाडीच्या समोर समोर भजन म्हणत होते मुलांचा आनंद पाहण्यात जोग होता. यासाठी गावातील पालक मंडळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व संपूर्ण गावकरी यांनी खूप सहकार्य केले. प्रत्येक गावकरीने आपल्या परीने शाळेत प्रवेश उत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य केले. यावेळेस नगरपालिकेतले दोन्ही वार्ड मधली नगरसेविका तसेच स्वीकृत सदस्य या कार्यक्रमा करिता हजर होते.
पहिल्या दिवशी प्रवेश पात्र मुले व इतर वर्गातील सर्व मुलांना पाठ्यपुस्तक सर्व मान्यवर मंडळीच्या हस्ते वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी इतर गावातील मुले शाळेत प्रवेशासाठी येत आहे. दुर्गापुर शाळेत आजूबाजूच्या सर्व गावातील पालकांचा आपल्या पाल्याला या शाळेत टाकण्या साठी उत्सुक असतात. याही वर्षी त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणे दिसत आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी बाहेरगावीती मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शाळेत दाखल झालेले आहे. याचे कारण म्हणजे इथं शैक्षणिक गुणवत्ता खूप उत्तम दर्जाची आहे. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक डी एस मेश्राम सहाय्यक शिक्षक पी.एम चौधरी या दोन्ही शिक्षकांनी सर्व पालकांना शाळेत प्रवेशासाठी संपर्क केलेला आहे. शाळा प्रवेश उत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री डी एस मेश्राम सहाय्यक शिक्षक पी.एम चौधरी स्वयंपाकी मदत तसेच संपूर्ण गावकरी यांनी खूप मेहनत घेतली.

