Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

रात्री हत्यारासह दरोडा घालण्याच्या तयारीत असणारे सराईत गुन्हेगार यांना रात्रगस्तीला असणारे शिवाजीनगर व डेक्कन पोलीस स्टेशन पोलीस स्टाफ यांचेकडुन जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 5, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
रात्री हत्यारासह दरोडा घालण्याच्या तयारीत असणारे सराईत गुन्हेगार यांना रात्रगस्तीला असणारे शिवाजीनगर व डेक्कन पोलीस स्टेशन पोलीस स्टाफ यांचेकडुन जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

शिवाजीनगर व डेक्कन पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या उद्देशाने विशेष मोहिम राबविण्याबाबत मा. पोलिस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी प्रभावीपणे कारवाई करणेबाबत वारंवार सूचना दिल्या आहेत.

मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. प्रविण कुमार पाटील, मा. पोलीस उपायुक्त परि-०१ श्री. संदिप सिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग श्री. वसंत कुवर यांचे सुचनांप्रमाणे गुन्हेगारीवर आळा बसविणेबाबत युद्ध पातळीवर काम चालु असताना दिनांक ०४/०७/२०२३ रोजी मध्यरात्री ११/३० वाजणेचे सुमारास वृध्देश्वर घाट, शिवाजीनगर पुणे येथे नदीपात्रालगत असलेल्या गोठ्याजवळ ०८-०९ मुले ही हातामध्ये धारदार शस्त्रे घेवून काही योजना आखत असलेबाबत सहा पोलिस निरिक्षक भोलेनाथ अहिवळे यांना गोपनीय माहिती मिळाली. लागलीच सपोनि अहिवळे यांनी सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना कळविली. याबाबत वरिष्ठांनी सदर ठिकाणी जावून खात्री करून कारवाई करणेबाबत आदेशित केले.

सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रवाना होवुन सदर ठिकाणी तात्काळ पोहचुन बातमीचे अनुषंगाने वृध्देश्वर घाट, शिवाजीनगर पुणे येथे नदीपात्रालगत असलेल्या गोठ्याजवळ ०८-०९ मुले ही हातामध्ये धारदार शस्त्रे घेवून उभे असलेली मिळुन आली.. याठिकाणी सदरची मुले ही हत्यारासह उभी असल्याने तसेच ती नदीपा आतील मोकळे मैदानाचा व अंधाराचा फायदा घेवुन पळुन जावु नये याकरीता सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे यांनी त्याठिकाणी अंधारामध्ये दबा धरून, डेक्कन पोलिस ठाणे कडील राजगस्तीवर असलेल्या महिला पोलिस उप निरिक्षक मिरा कवटीकवार आणि त्यांच्या पोलिस स्टाफची मदत मागितली परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन डेक्कन पोलिस ठाणे कडील राजगस्तीवर असलेल्या महिला पोलिस उप निरिक्षक गिरा कवटीकवार आणि त्याचा पोलिस स्टाफ हा तात्काळ त्याठिकाणी हजर झाला. यावेळी सापळा रचुन सदर मुलांना पोलीस आल्याचे समजल्यावर पळून जात असताना त्यांचा काही अंतरावर पळत जावुन पाठलाग करुन रथा सर्वांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. यावेळी सहा पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे यांनी त्यांची व पोलिस पथकाची त्यांना ओळख करुन देवुन त्यांना त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांची नावे १) गौतम ऊर्फ लखन अंबादास बनसोडे वय २५ वर्ष राहणार पीएमसी कॉलनी, बिल्डिंग नंबर ३ राजेंद्रनगर पुणे २) राम विलास लोखंडे वय २३ वर्ष, नवी पेठ पुणे ३) सुनिल बाबासाहेब कांबळे, वय २० वर्ष, रा. गल्ली नंबर १० पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे ४) अश्रु खंडु गवळी, वय १९ वर्ष, रा. दांडेकर पुल, पुणे ५) रोहन किरण गायकवाड वय १९ वर्ष, राहणार गल्ली नंबर ५. पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे ६) रोहित चांदा कांबळे, वय १९ वर्ष रा. गल्ली नंबर १०. पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे ७) किरण सिताप्पा कांबळे वय ५९ वर्ष, रा. गल्ली नंबर ५. पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे ८) ओंकार बाळु ननावरे वय २१ वर्ष, रा. राजेंद्रनगर, नवी पेठ पुणे ९) श्याम विलास लोखंडे, वय २० वर्ष, रा. राजेंद्रनगर, नवी पेठ पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी हत्यारासह साई पेट्रोलपंप, जंगली महाराज रोड येथे जावून लुटमार करणार होतो असे सांगितले.. सदर आरोपी यांचेकडून एक लोखंडी कोयता, एक स्टिलचा रॉड, दोन चाकु, ९ मास्क एक मिरचेची प्लास्टिकची पुड आणि नायलॉनची रस्सी असा मुददेमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे. याबाबत सदर आरोपींवर डेक्कन पोलिस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. १०७/२०२३ भादवि कलम ३९९ ४०२ अन्वये गुन्हा नोंद करणेत आलेला आहे.

सदरची कामगिरी ही श्री. प्रविण कुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. संदिप सिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त परि-०१, पुणे शहर श्री वसंत कुवर, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विपीन हसबनीस, शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री विक्रम गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री शंकर साळुंखे, सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, महिला पोलिस उप निरिक्षक मिरा कवटीकवार पोलीस अंमलदार सिध्देश्वर वाघोले, रामकृष्ण काकड, श्रीकृष्ण सांगवे, विकास सराफ आणि डेक्कन पोलिस ठाणेकडील पोलीस अंमलदार अशोक इनामदार, गणेश तरंगे, शेखर कौटकर, निलेश सोनवणे, नागनाथ बागुले, जगदीश तळोले, मिलीद कदम यांनी केलेली आहे.

मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार व मा.पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक यांनी वरील कामगीरी करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस आयुक्त कार्यालय येथे बोलावून त्यांचा सन्मान केला आहे.

Previous Post

Mostbet Tr Ile Spor Bahisleri ᐉ Türkiye’deki Mostbet Bahis Şirket

Next Post

सांगली: आई वडील आणि मुलीने मिळून केली बँकेची कोट्यवधीची फसवणूक, 3 आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सांगली: आई वडील आणि मुलीने मिळून केली बँकेची कोट्यवधीची फसवणूक, 3 आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

सांगली: आई वडील आणि मुलीने मिळून केली बँकेची कोट्यवधीची फसवणूक, 3 आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In