राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- बौद्ध मातंग, मुस्लिम सह सर्व वंचित बहुजन समाजा वरील अत्याचाराच्या विरोधात गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी दुपारी बारा वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रचंड जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर वर धडकेल. वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर पूर्व आणि पश्चिम जिल्ह्याच्या वतीने या प्रचंड जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये बौद्ध, मातंग, मुस्लिम, वंचित बहुजन समाजावर सातत्याने रोज हल्ले होत आहे. अत्याचाराच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेले तर पोलीस पिडितांवर दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन गुंड प्रवृत्तीस पाठिसी घालत आहे. मुस्लिम समाजाच्या जरीन खानला साध्या चौकशीच्या नावाखाली पोलीस स्टेशनला नेऊन त्यांच्या मुलासमोर निर्भयपणे त्यांचा खून होतो, मुलाला सुद्धा अमानुष पणे मारल्या जातो. अशा परिस्थितीत पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही त्यांना निलंबित केले जात नाही. म्हणून पोलीस अधिकारी मुजोर झाले आहेत. आमचे कुणीही वाकडे करणार नाही अशा अविर्भावात बौद्ध, मातंग, मुस्लिम, वंचित बहुजन समाजासी वर्तन करत आहेत. या सर्वांना स्थानिक राजकीय पुढार्यांचे पाठबळ आहे की काय अशी शंका येत आहे.
त्यामुळे संविधान मांनणाऱ्या मानवतावादी लोकांना या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढावेच लागेल. जरीन खान मृत्यू प्रकरण सारख्या घटना पुन्हा होऊ नये म्हणून गुंड प्रवृत्तीच्या विरोधा मध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्या साठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर पूर्व व पश्चिमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड जनआक्रोश मोर्चाचे रणसिंग फुंकले आहे.
या मोर्चा मधील प्रमुख मागण्या १) जरीन खानचा पोलीस कोठडीत खून करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा 302 गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करून आरोपीला सेवेतून तात्काळ निलंबित करावे. २) दोन जरीन खानच्या कुटुंबीयांना 50 लाखाची शासकीय आर्थिक मदत मिळावी. ३) अहमदनगर जिल्हा अकोला येथील अश्रफ अतिक शेख याचाही धर्मांध लोकांनी अमानुषपणे खून केला आहे, यातील मास्टर माईंड कोण शोधून दोषींना कडक शासन करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी. ४)जळगाव, अमळनेर येथील अशपाक सलीम शेख याची सुद्धा पोलीस कष्टडीत हत्या केली त्या दोषी पोलिसांना सुद्धा तात्काळ निलंबित करून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश्यांकडून न्यायालयीन चौकशी करावी. ५) नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावच्या अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी व सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे ६) बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील कदम कुटुंबावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा द्यावी. ७) रेनापुर येथील मातंग बांधवांचा खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी. अशी मागणी केली आहे.
तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या संविधानवादी सर्व जनतेने या प्रचंड जन आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे. मोर्चाचे नेतृत्व पुराणिक गोंगले जिल्हाध्यक्ष पूर्व विभाग, सोमाजी गोंडाणे जिल्हाध्यक्ष पश्चिम विभाग, जयदीप खोब्रागडे कार्याध्यक्ष पूर्व विभाग, कविता गोरकार जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, बंडूभाऊ ठेंगरे महानगर अध्यक्ष चंद्रपूर, तनुजा रायपुरे महानगराध्यक्ष महिला आघाडी, सतीश खोब्रागडे महानगर कार्याध्यक्ष, शुभम मंडपे जिल्हाध्यक्ष युवक आघाडी, निखिल रत्तेवार शहराध्यक्ष युवक आघाडी, धीरज तेलंग जिल्हाध्यक्ष सम्यक वि.आंदोलन यांच्या नेतृत्वामध्ये निघेल.
या मोर्चाचे मार्गदर्शक रमेशकुमार गजबे माजी राज्यमंत्री पूर्व विदर्भ समन्वयक, कुशल मेश्राम राज्य कार्यकारिणी सदस्य, अरविंद सांदेकर पूर्व विदर्भ समन्वयक. मा. राजेश बोरकर जिल्हा प्रभारी हे सर्व उपस्थित राहणार आहेत.

