उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली, गुरुवर्य प्रभाकर ओवाळे अमृत महोत्सव समितीच्या वतीने गुरुवर्य प्राचार्य प्रभाकर बाबुराव होवाळे यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनी सोहळ्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सांगलीतील माळी मंगल कार्यालय या ठिकाणी गुरुवर्य प्राचार्य प्रभाकर बाबुराव होवाळे यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनी सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योगपती अँड. सी.आर सांगलीकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार प्रा.शरद पाटील होते.
जीवनात धम्म महत्त्वाचा आहे. विहारमध्ये पुरुषच येतात स्त्रिया येत नाहीत. या पुढील काळात स्त्रियांनी बोलायला शिकले पाहिजे. स्त्रिया बोलतात पण नको तिथे बोलतात. पाहिजे जिथे बोलत नाहीत. बदलत्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे. गुरुवर्य प्राचार्य प्रभाकर होवाळे यांचा आदर्श समाजाने घेतला पाहिजे. असे प्रतिपादन यावेळी अँड. सी आर. सांगलीकर यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी अँड.सी.आर. सांगलीकर व प्रा. शरद पाटील यांच्या हस्ते प्राचार्य प्रभाकर होवाळे यांचा अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. प्रतिभा होवाळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी जीवन प्रभा गुरुवर्य प्रभाकर होवाळे गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव होवाळे, नंदाराणी होवाळे, प्रमोदिनी गायकवाड, अनुष्का पवार, अरविंद पवार, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली, गुरुवर्य प्रभाकर ओवाळे अमृत महोत्सव समिती यांनी केले होते. यावेळी प्रभाकर मोहाळे सर यांचे नातेवाईक मित्रपरिवार सहकारी शिक्षक यांनी आपल्या मनोगताच्या वेळी सरांच्या कार्यांचा आढावा घेतला. सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव करून कार्याचा गुणगौरव केला.
यावेळी गुरुवर्य प्राचार्य प्रभाकर बाबुराव होवाळे यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनीनिमित्त प्रा.शरद पाटील व अँड सी.आर सांगलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सौ.प्रतिभा होवाळे, सुधीर कोळप, सुनिता धमकिर्ती, उषाताई कांबळे, एस.आर.माने आदी उपस्थित होते.
यावेळी बौद्ध धम्म संस्कार संघाचे अध्यक्ष डॉ, सुधीर कोलप, पारमित धम्मकिर्ती, गौतमीपुत्र कांबळे, सुरेश दुधगावकर, किरण कांबळे, विलास उबाळे, एस.आर माने, सुनीता धम्मकीर्ती, अरुण कांबळे, एड. संजय साबळे, साहेबराव लोखंडे, मालन शिरगुपीकर, उषाताई कांबळे, भारत कदम, दादासाहेब धेंडे आदी बौद्ध धम्म संघाचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन वाघमारे आणि दीपमाला दीपक कांबळे यांनी केले. आभार अमोल होवाळे यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 976645348/7385445348

