युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कन्हान कामठी येथे राजेंद्र मुळक यांच्या जनसंपर्क कार्यालय, कन्हान येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषद तर्फे सर्व कलाकार मंडळी सोबत चिंतन सत्र बैठकीचे आयोजन मनिष भिवगडे केंद्रीय अध्यक्ष, विदर्भ शाहीर कलाकार परिषद, अलंकार टेंभूर्णे कार्याध्यक्ष, विदर्भ शाहीर कलाकार परिषद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
मागील नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात सांस्कृतिक मंत्री यांना विदर्भ शाहीर कलाकार परिषदे तर्फे निवेदन सोपवण्यात आले होते व त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल व परिषदेचे सर्व मांगण्या पूर्ण होतील अशी आश्वासने देण्यात आले होती, अद्याप ही त्यावर अजून काही निर्णय घेण्यात आले नाही त्यामुळे कलाकार मंडळींना उद्भवणारे अडी-अडचणी वर सर्व कलाकार पदाधिकारी व सदस्य यांच्या शमक्ष चर्चा करण्यात आले व समोरील वाटचालीची रूपरेखा निश्चित करण्यात आले.
यावेळी दयाल कांबळे, चुडामन लांजेवार, अरुण वाहने, मनोहर धनगरे, रामेश्वर दंडारे, गौरीशंकर गजभिये, ज्ञानेश्वर तायवाडे, पुरुषोत्तम डांगोरे, जिल्हा पत्रकार युवराज मेश्राम तसेच महिला प्रतिनिधी सौ.विद्या लंगडे, सौ. मंजुषा बनकर, सौ.मीरा कांगले, सौ.रंजना खाडे, सौ.जिजा डोंगरे, श्री.अशोक हूमने, श्री.आषिक राहुले, सुधीर लांजेवार, राहुल लांजेवार, दिलीपराव आसकर, दिगंबर मासुरकर आणि समस्त कलावंत उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

