महाराष्ट्र संदेश न्युज पुणे टीम
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस धडक कारवाई करत आहे. भयमुक्त पुणे निर्माण करण्यासाठी पोलीस झटत आहे. दिवसरात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांमुळे सामान्य नागरिक सुरक्षित असतात. त्यात गुन्हाची उकल करून गुन्हेगारांवर वचप ठेऊन सामाजिक सुरक्षा हे महत्वपूर्ण ध्येय नेहमी पोलिसांचे असते. आपले कुटुंब सांभाळून देशासाठी खाकी वर्दी परिधान करून नागरिकांचे रक्षण करणार्या पोलिसांचा महाराष्ट्र संदेश न्युजच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र संदेश न्युजच्या वतीने सन्मान वर्दीचा सन्मान वर्दीतील माणसाचा या उपक्रमअंतर्गत पुणे येथील स्वारगेट पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीसांचा सन्मान समारोह आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र संदेश न्युजचे पुणे ब्यूरो चीफ पंकेश जाधव यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.

यावेळी पुणे जिल्हातील महाराष्ट्र संदेश न्युजचे प्रतिनिधी पंकेश जाधव (पुणे ब्यूरो चीफ), आकाश पांचाळ, विनोद पिसाळ, फयाज, जोसेफ नडेसन, आसमा सय्यद, इरफान शेख, सौरभ वाघमारे व इतर मित्र मंडळीसह या महाराष्ट्र संदेश न्युजच्या प्रतिनिधी टीमने आनंदमय वातावरणात पोलिसांचा सन्मान आणि सत्कार केला.
यावेळी सौ. वैशाली भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 2, श्री. उज्वल मोकाशी पोलीस हवालदार गुन्हे शाखा युनिट 2, श्री. संजय जाधव पोलीस हवालदार गुन्हे शाखा युनिट 2, श्री.उत्तम तारु पोलीस हवालदार गुन्हे शाखा युनिट 2, पुष्पेंद्र चव्हान (पोलीस हवालदार गुन्हे शाखा युनिट 2 यांचा कार्याचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

आज पोलिस आपल्या राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षा देऊन सेवा करतात म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहतो. म्हणून आपल्या जीवनात पोलिसांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. देशाची आणि समाजाची सुरक्षा आणि देशाच्या शांततेसाठी पोलिसांची सेवा खूप आवश्यक आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे तसेच मालमत्तेची रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर सोपवलेली असते. ”जसे सैनिक सीमेवर राहून विदेशी शत्रूपासून आपल्या देशाचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे पोलिस राष्ट्रातील सर्व अडचणी सोडवण्यात आपली मदत करतात. कुठेही भांडण-तंटा झाला तर पोलीस तत्पर उभे राहतात. पोलिस 24 तास आपली सेवा करण्यात मग्न असतात. त्यामुळे पोलीस आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्र संदेश न्युजला आपल्या राज्यातील पोलिसांवर अभिमान आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

