Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जळगाव हादरलं, तीन महिन्यातच संसाराला लागली नजर, 3 सासवांनी मिळून.. नवविवाहितेची विहिरीत उडी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 13, 2023
in क्राईम, जळगांव, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जळगाव हादरलं, तीन महिन्यातच संसाराला लागली नजर, 3 सासवांनी मिळून.. नवविवाहितेची विहिरीत उडी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जिल्हातील पाचोरा येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या एका नवविवाहितेने आपल्या घरासमोर असलेल्या विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.

दि.13 जुलै गुरुवार रोजी पहाटेच्या सुमारास पाचोरा शहरातील गोविंद नगर भागातून नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली. काजल राहुल चव्हाण असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याघटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून विवाहितेस सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास होत असल्यानेच विवाहितेने आत्महत्या केली असल्याचा आरोप मृतक काजलच्या कुटुंबीयानी केला आहे. त्यानुसार, पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवाशी राहुल चव्हाण या तरुणाने तीन महिन्यांपूर्वी जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथील काजल राठोड हिच्या बरोबर प्रेमविवाह केला. सततच्या कुटुंबीक वादामुळे राहुल चव्हाण याने 10 जुलै रोजी आपल्या पत्नी काजल बरोबर पाचोरा येथील गोविंद नगर भागात भाड्याची खोली घेऊन राहायला आला होता.

13 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास काजल घरात दिसून आली नाही. तिचा शोध घेतला असता तिने घराजवळ असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने काजलला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी काजलला मृत घोषित केले.

काजलच्या आत्महत्येची बातमी काही क्षणात संपूर्ण गावात पसरली. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात काजलच्या आईसह माहेरच्या मंडळींनी एकच आक्रोश केला.

लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक दिली. त्यानंतर काजलला सासु सुग्राबाई चव्हाण, मुक्ताबाई चव्हाण, चुलत सासु पार्वतीबाई चव्हाण या किरकोळ कारणावरून टोचून बोलत असल्याने त्यांच्यात वाद होत होते. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळूनच काजलने आत्महत्या केल्याचा आरोप काजलच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. त्यानुसार, त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

पैशाचे आमिष दाखवून धमकावून अकोला जिल्हातील दलीत ‘शुभम’ बनला मुस्लिम ‘मोहम्मद अली’?

Next Post

लोणीकंद पोलीसांची हातभट्टीवर धडक कारवाई…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लोणीकंद पोलीसांची हातभट्टीवर धडक कारवाई…

लोणीकंद पोलीसांची हातभट्टीवर धडक कारवाई...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In