पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज रोजी आमचे अधिपत्याखालील गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अंमलदार निगडी पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पोकॉ अजित सानप व पोना नामदेव कापसे यांना त्यांचे गोपनिय बातमीवरुन 16.10 वा. चे सुमारासइसम नामे 1) राज उर्फ नन्या आनंद लष्करे वय 19 वर्षे रा. गोधंळे गल्ली, दत्तनगर – रामनगर पिंपरी 2) केशव उर्फ ओम किशोर आलंकार वय 18 वर्षे रा. सचिन टेलर्स जवळ दत्तनगर पिंपरी पुणे 3) वैभव उर्फ बाबु शशिकांत चौगुले वय 17 वर्षे रा. नागपंती डवरी गोसावी जवळ, दत्तनगर पिंपरी पुणे यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडून एकूण 6 अँड्रॉइड मोबाईल व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा एकूण 1,38,000/- रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीत यांचेकडून खालील गुन्हे उघडकीस आले आहेत-
1) चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर 435/2023 भादवि कलम 392, 34
2) चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर 437/2023 भादवि कलम 392, 34
3) दीघी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर 298/2023 भादवि कलम 392, 34
वरील नमुद गुन्हे उघडकीस आले असुन आरोपीत यांना गुन्हयाचेकामी चिखली पोस्टेला हजर केले आहे.
सदरची कार्यवाही गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे Asi केरप्पा माने Asi शिवानंद स्वामी, पोलीस नाईक आतिष कुडके,देवा राऊत नामदेव कापसे, पोलीस अंमलदार अजित सानप, शिवाजी मुंढे यांनी केली

