अर्पित वाहाणे, तालुका प्रतिनिधी आर्वी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- येथील उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात, काही दिवसांपासून गायनेकोलॉजिस्ट, व्यवस्था नसल्याने, प्रसुती रुग्णांची हेळसांड होत होती व त्यांना वर्धा सेवाग्राम सावंगी मेघे, अमरावती येथे जावे लागत होते आणि गोरं गरिबं रुग्णांना उपचारांसाठी नाहक आर्थिक र्भुर्दंड सोसावा लागत होता. त्यामुळे आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते.
या सर्व बाबी लक्षात घेऊन आमदार अमरभाऊ काळे यांच्याशी चर्चा करून माजी आरोग्य सभापती, रामू राठी व युवक काँग्रेस आर्वी शहर कांग्रेस कमेटी यांनी यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे येत्या आठ दिवसांत जर का स्त्री रोग तज्ञ उपलब्ध न झाल्यास रुग्णालयावर थेट धडक मोर्चा काढण्यात येणार असा धडक इशारा दिला होता. यामुळे आरोग्य विभागाला जाग आली आणि आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली.
काँग्रेस पक्षाच्या रामू राठी व सहकारी यांच्या वतीने देण्यात आलेल्या इशाऱ्या नंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी या समस्येची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन डॉ. सायली मुळे यांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोगतज्ञ, यांची नियुक्ती उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे गायनेकोलॉजिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली. जेणेकरून प्रसुती रुग्णांचे होणार हाल काही प्रमाणात कमी होईल.
गायनेकोलॉजिस्ट ही सेवा आपल्या उपजिल्हा रुग्णालयात नेहमी अशीच सुळरीत पणे चालु राहो. वैद्यकीय अधीक्षक डॉ, सुटे यांनी याबाबत पाठपुरावा केला करून स्त्रीरोग तज्ञ यांच्या नियुक्ती साठी प्रयत्न केला म्हणून त्यांचे विशेष आभार आमदार अमरभाऊ काळे यांचे ज्यांनी वरीष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकर प्रश्न मार्गी लावला. त्यांचे आभार रामु राठी, माजी आरोग्य सभापती, तथा माजी नगरसेवक, नगरपरिषद आर्वी
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

