हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरातील गौरक्षण वॉर्डमध्ये आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल ऑटो आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 6 शाळकरी मुले व ऑटो चालक जखमी झाले आहे अशी माहिती समोर आली आहे.
बल्लारपूर येथील राहणारे ॲटोचालक महादेव केशकर वय 52 वर्षे हे माउंट इंग्लिश मीडियम स्कूल बल्लारपूरच्या मुलांना शाळेत घेऊन जात असताना MH 34 BR 6741 क्रमांकाच्या भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. दैवबलवत्तर म्हणून जीवित हानी झाली नाही. तरी यात विद्यार्थी आणि चालकाला गंभीर मार लागला आहे.
गौरक्षण वॉर्डातील भालेराव शाळेजवळ अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात होता. या ट्रॅक्टरने शालेय विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या ऑटो क्रमांक MH 34 D 5583 ला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ऑटोचे पूर्ण चेंदामेंदा झाला.
या अपघातात 5 व्या वर्गात शिक्षण घेत असलेली एंजल महादेव केशकर वय 10 वर्ष, चतुर्थी दिलीप वासाडे वय 9 वर्ष, चेतवन संदेश रामटेके वय 8 वर्ष, कृषीका संदेश रामटेके वय 6 वर्ष, शुभ्र विजय घोंगे वय 10 वर्ष, समर्थ महादेव केसकर वय 11 वर्ष, संपज्ञ महेश वानखेडे वय 9 वर्ष यांच्यासह ऑटोचालक महादेव केसकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील एक विद्यार्थिनीची हालत गंभीर असल्याने तिला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात कारवाईसाठी लावण्यात आला आहे, तर ऑटोचे झालेल्या नुकसानीची भरपाई ट्रॅक्टर मालक रोशन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून पुढील तपास सुरू बल्लारपूर पोलिसांनी सुरू केला आहे.

