युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन सावनेर:- मणिपूर येथे झालेल्या दंगली व महिलांचे नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला याबद्दल यासंदर्भात सावनेर येथील विविध संघटनेच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार शिगेला पोहोचला आहे. दररोज हिंसाचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. आता येथील हिंसाचाराने क्रूरतेचा कळस गाठला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली आहे. एवढंच नव्हे तर जमावाने संबंधित महिलांना रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. ४ मे २०२३ रोजी ही घटना घडल्यानंतर पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती.
हा व्हिडिओ समोर येतात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सावनेर शहरात विविध संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला ल. यावेळी जनकल्याण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भगवान चांदेकर, शिवसेना शहर अध्यक्ष सुभाष मछले, जय शिवाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश इंगोले त्याचप्रमाणे भारत छेनिया, सामाजिक कार्यकर्ते सचिन लीडर यांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

