हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा :- शाळा महाविद्यालये पूर्ववत चालू झाली चंद्रपूर कवठाळा ते इरई बस विधार्थ्याकरिता सकाळी महाविद्यालयात जाण्या साठी 7 किलोमीटर पायदळ जाऊन कवठाला येथून बस पकडून महाविद्यालयात ये-जा कराव लागत होते कधी बस मिळत होती कधी बस सुटत होती अनेक डा विध्यार्थ्यांना कवठाळा येथून बस सुटल्याने परत घरी यावं लागत होते इरई येथून गेल्या दोन वर्ष्या पासून बस सेवा 1 वेळ सुरु होती. त्यामुळे विद्यार्थांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत होता.
या सर्व महाविद्यालयीन विध्यार्थीनचा त्रास बघून युवा स्वाभिमान पार्टी चे कोरपणा पंचायत समिती सर्कल अध्यक्ष यांनी चंद्रपूर आगाराला भेट देत त्या मार्गावरील समस्या जाऊन घेऊन युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाअध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे याच्या मार्गदर्शनातुन त्या समस्या सोडवण्यासाठी दिनांक 13 जुलै ला आगार प्रमुख यांची भेट घेऊन सकाळी कवठाळा येथे येत असलेली 91 नंबर ची सकाळी आणि दुपारची बस फेरी इरई करीता चालू करण्यासाठी निवेदना मार्फत मागणी केली असता सदर मागणी ची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळणी दखल घेतली असून इरई येथे दिनांक 25/06/2023 पासून 91 नंबर ची सकाळ आणि दुपारची फेरी चालु केली असून इरई येथील नागरिकांनी आणि विध्यार्थ्यांनी युवा स्वाभिमान पार्टी चे निखिल पिदूरकर याचे आभार व्यक्त केले या वेळेस इरई येथील युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष बाळकृष्ण भोयर, उपाध्यक्ष प्रथम तेलंग, शाखा प्रमुख सुनील तेलंग, शाखा सचिव धनराज भगत आणि इरई सदस्य, उपस्थित होते.

