Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

बुलढाण्यात भीषण अपघात दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; 7 प्रवाशी ठार; 25 ते 30 गंभीर जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 29, 2023
in अपघात, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बुलढाण्यात भीषण अपघात दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; 7 प्रवाशी ठार; 25 ते 30 गंभीर जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज /ऑनलाईन बुलढाणा:- जिल्हातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येथील मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वर दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, 25 ते 30 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज (शनिवार) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडली आहे.

एम एच 08. 9458 ही अमरनाथची तिर्थयात्रा करुन ही ट्रॅव्हल्स हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तिर्थयात्री होते. एम. एच 27 बी. एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात होती. मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावर दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातत सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील ते 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत.


या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक अशोक रत्नापारखी,दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलिस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी तातडीनं मदत कार्य सुरू केले आहे. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना अॅम्बुलन्स वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पोलिस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी जखमींना पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवले. घटनास्थळाला पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी गवळी, ग्रामीण पो.नी एफ.सी. मिर्झा यांनी भेट दिली आहे.

या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 प्रवासी जखमी आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाण्यात हलवण्यात आले आहे. दरम्यान यातील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सर्व मृत हे हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

वाघोलीतील बेकायदेशीर गावठी दारु विकणाऱ्याची ०१ वर्षासाठी कारागृहात रवानगी लोणीकंद पोलीसांची कारवाई

Next Post

मोका सारख्या गंभीर गुन्ह्यात सहा महिन्यापासून पाहिजे असलेला आरोपीस Unit-2 ने केले जेरबंद🔗

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मोका सारख्या गंभीर गुन्ह्यात सहा महिन्यापासून पाहिजे असलेला आरोपीस Unit-2 ने केले जेरबंद🔗

मोका सारख्या गंभीर गुन्ह्यात सहा महिन्यापासून पाहिजे असलेला आरोपीस Unit-2 ने केले जेरबंद🔗

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In