✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दिनांक ३१ जुलै:- रोजी पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी वर्धा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन व शाखा येथील पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या अडचणी, तक्रारी व सुचना जाणून घेण्याकरीता व त्यांचे प्रभावी निरसन करण्याचे उद्देशाने ई-दरबाराचे आयोजन केले. सदरचा अभिनव प्रयोग वर्धा जिल्ह्यातील पोलीस दलाकरीता पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर ई-दरबारमध्ये जिल्ह्यातील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी हिरीरीने भाग घेतला व आपल्या शंका व तक्रारी तसेच वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्रालयीन कर्मचारी यांचेकडून होत असलेल्या पोलीसांचे वैयक्तीक कामातील दिरंगाई बाबत माहिती पोलीस अधीक्षक यांना दिली. त्यामध्ये प्रामुख्याने मेडीकल बिल, पोलीस रहिवासी क्वार्टर मधील सुविधा, रखडलेली पदोन्नत्ती, रखडलेली वेतनवाढ, कुंटुंबियांच्या अडचणी असे अनेक मुद्दे निर्भिडपणे थेट पोलीस अधीक्षक यांच्या समक्ष मांडले.
यावेळी पोलीस अधीक्षक यांनी शक्य त्या अनेक तक्रारींचे वेळेवरच संबधित मंत्रालयीन कर्मचारी व पोलीस अधिकारी यांना सुचना देवून निरसन केले व उर्वरीत तक्रारींबाबत वरिष्ठ स्तरावर शिघ्रतेने पाठपुरावा करून लवकरच निरसन करण्याची ग्वाही दिलेली आहे. सदर ई-दरबार पोलीस अधिकारी/अंमलदार यांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहता सदरची सुनावणी दर महिन्यात घेवून पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे सर्व प्रश्न निकाली लावण्यात येतील असे पोलीस अधीक्षक यांनी मत व्यक्त केले आहे. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या ई-दरबार या अभिनव प्रयोगाबाबत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यात कुतूहल व्यक्त केले जात आहे.

