✍️अर्पित वाहाणे आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- दिनांक 5 ऑगस्ट रोजी खडका येथे वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. वंचीत बहुजन आघाडी च्या वतीने गावा तिथे शाखा उपक्रम राबविले जात आहे. त्यामुळे प्रत्येक गावात शाखा उद्घाटन सुरू करण्यात आले आहे.
या आढावा बैठकीत वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश व पक्ष वाढवण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी विनय भांगे महाराष्ट्र प्रदेश सदस्य व आशिष गुजर युवा जिल्हा अध्यक्ष व दर्पण टोकसे उपजिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा महासचिव ज्ञानदिप धुर्वे, निरंजनभाऊ पाटील विधानसभा समनवेक, कमलेशभाऊ कामडी जिल्हा महासचिव, विनोद भाऊ पायले तालुका अध्यक्ष आर्वी, निखिल खडसे तालुका अध्यक्ष आष्टी, गुड्डू भाऊ वाघमारे, राजेश भाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम ठेवण्यात आला गावकरी व पदाधिकारी मोठ्यासंख्येने गावकरी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

