अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- लॉयन्स क्लब २०२३-२४ करीता स्थापना आणि पदग्रहण समारोह मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. शिवम पुण्यानी थांनी भुषविले तर मुख्य अतिथी तथा स्थापना अधिकारी डॉ. रिपल राणे, तर प्रमुख वक्ते डॉ. विरल शाह, विशेष अतिथी वासू ठाकरे, डॉ.रवींद्र हुसूकले, विलास बांगरे हे हजर होते. लायन्स क्लब सावनेर चे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा.विलास डोईफोड़े, सचिव रुकेश मुसले आणि कोषाध्यक्ष हितेश ठक्कर यांना पदग्रहण शपथ डॉ. रिपल राणे यांनी दिली. मागील वर्षात घेण्यात आलेल्या विवीध आरोग्य, शिक्षण, पर्यावरण उपक्रमाचे अहवाल वाचन क्लब चे मावळते सचिव प्रा.विलास डोईफोडे यांनी केले तर ट्रेझरी अहवाल वाचन डॉ. प्रविण चौहान यांनी केले.
यावेळी समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याची आणि पर्यावरणाची काळजी वाहण्याची आंतरराष्ट्रीय लायन्स कल्ब ची परंपरा भविष्यात कायम राहील असे मनोगत डॉ. रविन्द्र हुसुकले यांनी व्यक्त केली. लायन्स क्लब करीत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांत समाजातील आर्थिकदृष्ट्या सशक्त घटकांनी हातभार लावावा असे प्रतिपादन डॉ.विरल शाहा यांनी केले. इंडक्शन अधिकारी वासु ठाकरे यांनी शशांक देशमुख व अमृता देशमुख यांना नवीन सदस्यांच्या स्वरुपात शपथ दिली.
यावेळी डॉ.प्रवीण चव्हाण यांना गेल्या सत्राचे उत्कृष्ट लायन म्हणून गौरविण्यात आले तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकारी आणि सदस्यांना सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी क्लबच्या उपक्रमांची मुक्तकंठाने प्रसंशा केली. याप्रसंगी लायन परिवारातील विद्यार्थ्यांना विविध परीक्षेतील यशाबद्दल गौरविण्यात आले. क्लब ध्वज वंदना पियुष झिंजूवाडिया यांनी सादर केली. अतिथिंचे स्वागत डॉ.शिवम पुण्यानी यांनी तर परिचय डॉ. अमित बाहेती आणि प्रवीण टोणपे यांनी केला. संचालन ऍड. अभिषेक मुलमुले व ऍड.अन्वेषा मुलमुले तर आभार प्रदर्शन चार्टेड प्रेसीडेंट वत्सल बांगरे यांनी केले. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उपक्रमांच्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. सदर स्थापना समारोहास प्रामुख्याने आयएमए अध्यक्ष डॉ.आशिष चांडक, जयंतराव मुलमुले, एड. घाटोळे, अतुल बांगरे, राजूभाऊ पुण्यानी, दिपक झिंझुवाडिया, प्रा.झोपे, राधेश्याम बाहेती, प्रा.जगदीश बाहेती, हरीश पटेल हजर होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता एड. मनोज खंगारे, डॉ.परेश झोपे, हितेश पटेल, मनोज पटेल, रुपेश जीवतोड़े, मिथिलेश बालाखे, सुशांत घटे, मृणालीनी बांगरे, डॉ स्वाती पुण्यानी, प्रीति डोईफोडे, डॉ. श्वेता चव्हाण, चित्रा झोपे, नेहा झिंजूवाडिया, कीर्ती टोणपे, रीमा बालाखे, सौ. माधुरी खंगारे, रिता घटे, नीता पटेल, श्रद्धा जिवतोडे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी राष्ट्रगीत गायनाने समारोहाची सांगता झाली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

