मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.१० ऑगस्ट:- तालुक्यातील सेलू (मुरपाड) येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे नेहमीच्या त्रासामुळे गावकऱ्यांनी एका 30 वर्षीय सराईत गुन्हेगाराची हत्या केल्याची घटना काल बुधवारी रात्री दरम्यान घडली. आकाश उल्हास उईके असे मृतक तरुनाचे नाव असून याच्या हत्ये प्रकरणी 4 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. घेतले असून यात जवळपास एकूण 18 ते 20 आरोपिंचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.
मृतक आकाश उल्हास उईके हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर चोरी, गुंडागर्दी करीत दहशत निर्माण करणे अशे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसात नोंद आहेत. नुकताच ३- ४ दिवसांपुर्वी तो एका गुन्ह्यात जेलमधून बाहेर आला होता. त्याचे हिंगणघाट शहरातील कुख्यात गुन्हेगाराशी त्याचे संबंध असून गावातील नागरिक त्याचे कारवायांमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त होते.
काल दि.९ रोजी रात्री १०.३० चे दरम्यान तो नशेतच गावातीलच काही दारू विक्रेत्यांकडे दारूसाठी गेला, परंतु त्याला दारु न मिळाल्याने तो गावातील नागरिकांना त्रास देत दहशत माजवू लागला, या दरम्यान एका युवकाच्या दुचाकी ला लाथ मारून पाडली. यानंतर पुन्हा वाद करीत तो ग्रामपंचायती समोरील चौकात पोचला. तेथे उपस्थित तरुणांशी पुन्हा त्याचा वाद घालायचा सुरुवात केली. या नेहमीच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या तरुणांनी त्याला वीट मारून जखमी केले, लाठ्याकाठ्या घेऊन त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला. या दरम्यान गुन्हेगार प्रवृत्तीच्या आकाश उल्हास उईके याला जखमी अवस्थेत शहरांतील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या हत्याकांड प्रकरणी शरद अशोक सातपुते, गजू सुर्यभान खडसे, प्रकाश सूर्यभान खडसे, पांडुरंग मारोती देवतळे या गावकऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहेत.

