अक्षय अरुण म्हात्रे पेण तालुका प्रतिनिधी मोबा.7276222387
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- “भीक दो आंदोलन” रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी भीक दो अशा गगनभेदी घोषणा करत आज भीक मांगो आंदोलन करण्यात आहे. आंदोलन खड्डे भरण्यासाठी भीक द्या, सरकार कडे मुंबई गोवा रस्त्याचे खड्डे भरायला पैसे नाहीत अश्या घोषणा देत आणि रस्त्यासाठी रस्त्या वरील ये-जा करणाऱ्या वाहन चालकाकडून एक दोन रुपये तरी द्या अशी विनंती करत आज ही भीक मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे भरण्या साठी तसेच महामार्ग पुर्ण करण्यासाठी भिक मागून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
मुंबई – गोवा महामार्गावरील पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांबाबत शासन आणि प्रशासनाने हात वर केले असुन हे खड्डे आता भरले जाणार नाहीत शिवाय आता खड्डे भरायला शासनाच्या तिजोरीत पैसे नाहीत अशी खळबळजनक वक्तव्य संबंधीत मंत्री करत असल्याने हे खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांचे जीव जाऊ नये या उद्देशाने खड्डे भरण्यासाठी शासनाला आर्थिक हातभार लागावा यासाठी पेण येथील सह्याद्री प्रतिष्ठान, सोबती संस्था आणि पेण मधील पत्रकारांनी एकत्र येऊन ” भीक दो ” आंदोलन केले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांच्यासह सह्याद्री प्रतिष्ठानचे शेकडो मावळे, सोबती संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब नेने, ॲड. मंगेश नेने, जेष्ठ पत्रकार विजय मोकल, प्रकाश म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, पेण मधील पत्रकार, सोबती संस्थेचे सदस्य आणि इतर सामजिक संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई – गोवा महामार्गाच्या पेण येथील वाशी नाका येथे भीक मागून जमा झालेले पैसे हे येत्या दोन दिवसांत नॅशनल हायवे कार्यालयांत जमा करण्यात येणार असल्याचे समीर म्हात्रे यांनी जाहीर केले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची एक लेन पूर्ण करण्याचा दिलेला शब्द पुर्ण केला नाही तर ते राजीनामा देतील का असा सवाल त्यांनी केला आहे.
मागील बारा वर्षांपासून सुरु असणाऱ्या मुंबई – गोवा महामार्गाचे काम संथ गतीने तर सुरु आहेच . दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की संबंधीत मंत्री, पालकमंत्री किंवा रायगड जिल्ह्यातील आमदार, खासदार या महामार्गाची पाहाणी करतात, ठरल्याप्रमाणे आश्वासने देतात हे आता कोकणवासीयांना नवीन राहिले नाही. मागील काही महिन्यांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या महामार्गाची पाहाणी करुन पावसाळ्यापूर्वी या महामार्गाची एक लेन पूर्ण होईल असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता काही झाली नाही. नसल्याने आणि आता या महामार्गावरील खड्डे भरायला शासनाकडे पैसे नसल्याचे खळबळजनक वक्तव्य केल्याने आता या महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, पेण मधील पत्रकार या आंदोलनात या भागातील विविध सामजिक संघटना, वाहतूक संघटना, प्रवासी संघटना, विविध प्रकारची मंडळे, विदयार्थी, ज्येष्ठ नागरीक यांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या महामार्गाबाबत असणारा संताप आणि राज्यासह केन्द्र शासानाबाबत असलेली निराशा व्यक्त केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

