उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी साकार करण्यासाठी; भारतीय राज्यघटनेत नमूद केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्या राष्ट्रातील लोकांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता; समाजातील वंचित घटकांना अंधश्रद्धा, अंधश्रद्धा, जातीय द्वेष, जातीय भेदभावाच्या भोवऱ्यातून बाहेर काढण्यासाठी, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थांना उच्च शिक्षणसाठी मदत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) स्थापना करण्यात आली होती. पण हीच बार्टी सस्था विविध कारणाने नेहमी चर्चेत असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, यांच्या भ्रष्ट व अनितीपूर्न कारभारामुळे बार्टी संस्था मलिन होत असून अनुसूचित जाती समूहाचे प्रचंड नुकसान होत आहे. अशा आरोप राज्यातील अनेक बुद्धिजीवी आणि संस्थांनी खळबळजनक लावत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. यांच्यावर कारवाई नाही झाली तर 15 ऑगस्टला बार्टीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी या संघटनांनी दिला आहे.
यावेळी महाराष्ट्र संदेश न्युज ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार या बार्टीला संपविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. भीमा कोरेगाव रणस्तंभ जागेच्या कागदपत्रातही छेडछाड करुन रोहन माळवदकर याला अधूनमधून भेटत आहेत. बौध्द अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करुन सनातनी प्रवृत्ती पोसण्याचे काम करीत आहे. बार्टी व भीमा कोरेगाव रणस्तंभ या आमच्या अस्मिता आहेत. त्यामुळे घरदार सोडून व जीवाची पर्वा न करता मी पुणे, मुंबई याठिकाणी वारंवार ये-जा करीत आहे. मी आमच्या भगिनींना सोबत घेऊन वेळोवेळी आंदोलने केली. दोन आंदोलनात सुनील ओवाळ सोबत होते. मात्र त्यांच्या काही अडचणींमुळे ते जादा वेळ देऊ शकत नाहीत. पण कविताताई, महानंदाताई व शकुंतलाताई या खंबीरपणे साथ देत आहेत. कविताताई या गेल्या वर्षभरापासून तक्षशीला महिला मंडळाच्या वतीने बार्टीच्या गैरकारभाराबाबत वेळोवेळी निवेदने देत होत्या. मात्र त्यांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवली जात होती.
आता त्यांना बैठकीसाठी वारंवार बोलावणं येत असतानाही त्या आता जात नाहीत. आम्ही कुणाच्याच दबावाला आणि आमिषाला कधीच बळी पडणार नाही. आता मानसीताई वानखेडे या सुध्दा आमच्या या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. हळूहळू आम्हाला फोन करून अनेक प्रामाणिक नेते व कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आम्हालाही बळ आले आहे. आमची लढाई ही समाजासाठी असून पदरमोड करून ही लढाई आम्ही लढत आहे. कारण हा विषय समाजाच्या अस्मितेचा विषय आहे. मी बार्टीसमोर उपोषणाला बसल्यावर माझ्यावर हल्ला होणार होता. मात्र मातंग समाजातील एका नेत्याच्या मध्यस्थीनंतर तो थांबला. पण आम्ही कदापि मागे हटणार नाही. तीन आंदोलने करूनही गेंड्याची कातडी पांघरलेला प्रशासनाला जाग येत नाही.
त्यामुळे आम्ही चौघेजण 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. आमच्या या लढ्याची रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर व माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड यांनी दखल घेऊन आमच्या सोबत राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही आत्मदहनचे निवेदन दिल्यानंतर इंदिरा अस्वार अमोल मिटकरी यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटली आहे. तिने आनंदराज आंबेडकर यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी तिची भेट नाकारली. आता आमच्या पाठीशी मित्र परिवार व समाजासह हे दोन दिग्गज नेतेही उभे राहिल्याने आम्ही कधीच मागे हटणार नाही. त्यामुळे १५ ऑगस्टला बार्टीसमोर करण्यात येणाऱ्या आत्मदहन आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

