मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मूलचेरा:- तालुक्यातील गोमणी परिसरात 15 ते 20 गावे असून आज स्वातंत्र्याचे 75 वर्ष होऊनही त्या परिसरातील जनतेला आपल्या मूलभूत गरजेपासून वंचीत रहा लागत आहे. आजही त्या परिसरात पिण्यासाठी शुद्ध पाणी, दळन वळनासाठी पक्के रस्ते, सिंचनासाठी पाण्याची सोय व विजेची समस्या पासून जनता त्रस्त आहेत. म्हणून त्या परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी भारत राष्ट्र समितीचे नेते, आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची आलापल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या समस्या सांगून गोमणी परिसरात आपण दौरा करून तेथील समस्या सोडविण्याची विनंती केली.
यावेळी प्रतिष्ठित व्यक्ती नारायणजी दिट्टीवार, बोध्यालुजी दिट्टीवार, नीलय्या श्रीरामवार, कासिफ पज्जलवार, अविनाश मडावी, रवी चौधरी, शफीक शेख, वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले, जुलेख शेख, संदीप बडगे, विनोद कावेरी, प्रवीण रेषे, मोरेश्वर कोटरंगे, माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

