✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुदपुर:- पोलिसांनी अवैध दारू तस्करी विरोधात जोरदार मोहीम राबवत अवैध दारू तस्करीचे कमरडे मोडले आहे. पोलिस निरीक्षक एस.बी. शेगांवकर समुदपुर हद्दीत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक कारवाई करत एस.बी.शेगांवकर सोबत पो.हवा अरविंद येनुरकर पो.हवा.अरविंद येनुरकर, पो.ना.रवि पुरोहित, पो.ना.राजेश शेंडे, पो.अं वैभव चरडे यानी आज दि. 19 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन समुद्रपूर डि.बी. पथकाचे यांनी दोन शासकिय पंचासह यातील नमुद आरोपी विवेक रामभाउ भिसेकर वय 21 वर्ष रा. संत तुकडोजी वार्ड पिंपळगाव रोड हिंगणघाट, विक्की कृपाकर मून, वय 17 वर्ष, रा. संत तुकडोजी वार्ड शिवसेना कॉर्टर जवळ हिंगणघाट विधी संघर्षीत बालकावर मौजा जाम चौरस्ता येथे सापळा रचून दारूबंदीबाबत प्रो.रेड केला असता, विधीसंघर्षीत बालक हे वेगवेगळ्या वेळी अवैधरित्या देशी दारू मालाची विक्री करीता वाहतुक करतांना मोक्कावर रंगेहाथ मिळून आले.
यावेळी त्यांचेजवळ वाहनांचे कागदपत्रे व ड्रायव्हिंग लासन्स नसल्याने मोक्कावरचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपी व विधी संघर्षीत बालकांचे ताब्यातून वरील नमुद वर्णनाचा जु.किं. 2,82,500 रू. चा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन मध्ये आरोपींना आणल्यानंतर आरोपी व विधी संघर्षीत बालकाविरूध्द नमुद कलमान्वये वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार सपोनि एस.बी. शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. पंकज मसराम, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.अं. वैभव चरडे, चा.पो.अं. रोशन उईके यांनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

