Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे जागरूक पत्रकारच चुकीच्या गोष्टी थांबू शकतात: राज ठाकरे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 20, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे जागरूक पत्रकारच चुकीच्या गोष्टी थांबू शकतात: राज ठाकरे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महारष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे .समाजातील चुकीच्या गोष्टी चव्हाट्यावर आणल्या पाहिजेत. अगदी माझ्यासकट… जागरूक पत्रकारच चुकीच्या गोष्टी थांबू शकतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपले मोकळे मत मांडले. पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारांनी पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषद व पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील पत्रकारांच्या गौरव समारंभाचे आयोजन शनिवार (ता.१९) रोजी केले होते. प्राधिकरण निगडी येथील ग .दि माडगूळकर सभागृहात हा कार्यक्रम पार पाडला प्रमुख वक्ते म्हणून राज ठाकरे बोलत होते. यावेळी पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्याबाबत राज ठाकरे यांनी निषेध व्यक्त केला. तसेच पत्रकारचा समाचार घेत त्यांची कानउघडणी केली.

पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्याचा हा विषय आहे …मग आमच्यावरील हल्ल्याचे काय असा प्रश्नच राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला उपस्थित केला. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, व्यंग्य चित्रकाराच्या माध्यमातून मी देखील अनेक वर्ष पत्रकारिता केलेली आहे. पत्रकारितेचा आतापर्यंतचा प्रवास मी जवळून पाहिलेला आहे. पत्रकारावरील हल्ले हे निषेधार्थ आहेत. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांची संख्या सध्या वाढली आहे. त्यांच्या कमेंटकडे दुर्लक्ष करा. नेते मंडळींना चुकीच्या गोष्टी तसेच चुकीचे निर्णय पत्रकारांनी दाखवून दिले पाहिजेत. पत्रकारांना राजकीय नेते मंडळीशी जास्त जवळीक साधू नये. अभ्यासू पत्रकारांची गरज आहे. माध्यमांची जबाबदारी वाढली आहे. आवश्यक ती माहिती प्रसारित माहिती प्रसारित केली पाहिजे. तुम्ही प्रसारित करता ते सर्वजण पाहत असतात. आमचे डोळे उघडणे आम्हाला प्रबोधन करणे चुकीचे काम करत असलो तर आम्हाला सुधारविणे हे पत्रकारांचे काम आहे. मात्र विनाकारण खोट्या बातम्या प्रसारित करू नये. जबाबदारीचे भान ठेवावे. संपादकांनी अशा गोष्टीला अटकाव केला पाहिजे. पत्रकारांनी चुकीचा निर्णय घेणाऱ्या पुढार्‍यांना देखील ठणकावून जाब विचारला पाहिजे आपल्या लेखणीतून समोरच्या व्यक्तीला त्याचे चूक दाखवली पाहिजे. ब्रेकिंग न्यूज देताना भान ठेवावे. देशभरातील पत्रकारिता पाहता महाराष्ट्रातील पत्रकारांचे राज ठाकरे यांनी यावेळी विशेष कौतुक केले.

दरम्यान राज ठाकरे यांच्या हस्ते पत्रकार गोविंद वाकडे, अश्विनी सातव -डोके, संदीप महाजन, कमलेश सुतार, अद्वैत मेहता, अमीत मोडक, अविनाश खंदारे, नितीन पाटील, आशिष देशमुख, सागर सुरवसे, अनिल मस्के यांना शाल व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक राजू मिसाळ, विठ्ठल उर्फ नाना काटे, राहुल कलाटे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे हे देखील राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी उपस्थित होते. मात्र राज ठाकरे यांचे भाषण संपताच या नेते मंडळींनी काढता पाय घेतला. मनसे अध्यक्षांच्या भाषणाला राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांची उपस्थिती हा विषय दिवसभर राजकीय वर्तुळात चांगला रंगला होता.
तीन सत्रामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध माध्यमातून वरिष्ठ संपादक या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते चर्चा सत्रामध्ये पत्रकारासमोरील अडचणी, धोके, सद्यस्थिती या विविध विषयावर भाष्य केले. पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्ड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Previous Post

भीषण अपघात, 33 प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, सर्वत्र मृत्युदेह पसरले.

Next Post

गोलाकर्जी येते माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गोलाकर्जी येते माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन.

गोलाकर्जी येते माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In