वाढीव मालमत्ता कर (टॅक्स) वाढीला स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येईपर्यंत स्थगिती…
दोन ते अडीच महिन्यांपासून सिंदी रेल्वे शहरातील नागरिकांचा, राजकीय पक्ष व संघटनांचा वाढीव मालमत्ता कर संदर्भात सुरु होता लढा..
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंदी रेल्वे:- सिंदी रेल्वे नगर पालिकेने मालमत्ता कर (टॅक्स) मध्ये अवाजवी केलेल्या वाढीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होई पर्यंत स्थगिती देण्यात आली. मागील तीन महिन्यांपासून सिंदी रेल्वे येथील नागरिकांनी, विविध राजकीय पक्ष व संघटनानी सिंदी रेल्वे नगर पालिकेने टॅक्स मालमत्ता करा मध्ये ३५ ते ४० टक्क्याने केलेल्या वाढी संदर्भात जनआंदोलन शेडले होते. नगर पालिकेच्या माध्यमातून करण्यात आली कर वाढ कोणत्याही कायद्यात बसत नव्हती. मालमत्ता कर वाढ रद्द करण्यासाठी राका प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व सिंदी रेल्वे शहरातील नागरिकांनी दिनांक ३० जून ला निवेदन दिले. दिनांक १२ जुलै ला नगरपरिषदेच्या घेराव करण्यात आला. २१ जुलै ला सिंदी रेल्वे शहरातील नागरिकांनी भर पावसात भव्य जन आक्रोश मोर्चा काढला अशा प्रकारे अनेकदा निवेदने, मोर्चा काढले असता शेवट प्रभारी मुख्याधिकारी यांनी या वारंवार दिलेल्या निवेदनाची दखल घेत १४ आगस्ट पर्यंत टॅक्स कमी करू असे सर्वांपुढे भोंग्यावर माईक लावून आश्वासन दिले होते. आज शासनाने पत्रक काढले असता त्याप्रमाणे पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होईपर्यंत मालमता कर वाढीला स्थगिती देण्यात आली आहे. अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या सिंदी शहर वासियांच्या या आंदोलनाला, या संघर्षाला अखेर यश मिळालं. सिंदी शहर वासियांमध्ये आनंद निर्माण झाला असून त्यांनी प्रशासनाचे मानले आभार.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, माजी नगराध्यक्ष बबनरावजी हिंगणेकर, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, माजी न.पा. उपाध्यक्ष सुधाकर खेडकर, माजी नगराध्यक्ष सुरेश सोनटक्के, माजी बांधकाम सभापती आशिष देवतळे, माजी न.पा उपाध्यक्ष अशोकबाबू कलोडे, माजी उपाध्यक्ष प्रा.अशोक कलोडे, माजी नगराध्यक्ष सुमनताई कलोडे, माजी नगराध्यक्ष संगीताताई शेंडे, माजी नगरसेविका वनिता मदनकर, माजी नगरसेविका सुमन पाटील, माजी नगरसेवक विलास तळवेकर, माजी नगरसेवक राम अवतार तुरक्याल, शिवसेना शहर अध्यक्ष सचिन लांबट, युवा शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, अल्पसंख्याक शहराध्यक्ष बबलू खान, जगदीश बोरकर, वसंता सिरसे, मोहन आंबोरे, सुनील शेंडे, धर्मेंद्र बडवाईक, राजू कोपरकर, युगल अवचट, फिरोज बेरा, अशोक कलोडे, कैलाश पालिवाल, अशोक सातपुते, सुरज सोनटक्के, प्रभाकर कलोडे, जगदीश बोरकुटे, गजानन खंडाळे, गुड्डू कुरेशी, प्रभाकर सोनटक्के, जगदीश बोरकर ,पंकज बावणे, सुधाकर वलके, सुमित तळवेकर, आशिष गवळी, उमेश पेन, विलास इखार, भुजंग वाघमारे, किशोर डुकरे, दिपक अग्रवाल, धीरज कवस्ती, राजू सोनटक्के, पप्पू पुकडे, मुकिंदा कामडी, हेमंत जाधव, विनोद कातोरे, गुड्डू महाजन, संदीप सोनटक्के, सचिन लांबट, राहुल जुमडे, किशोर खडतकर ,प्रशांत झिलपे ,प्रकाश सोनटक्के, सुधाकर सोनटक्के, पुरुषोत्तम घोडे, अजय कवडे, प्रमोद काटोले, शंकर काटोले, किशोर सोनटक्के आदींनी आभार मानले.
अव्याढव्य मालमत्ता कर चा संदर्भात सिंदी रेल्वे शहरातील नागरिकांनी विविध पक्षांनी सतत अडीच महिन्यापासून प्रभारी मुख्यधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली, आंदोलने केली, सतत पाठपुरावा केला. शेवट या पाठपुराव्याला, सिंदी रेल्वे येथील जनतेला यश प्राप्त झालं हे यश समस्त सिंदी रेल्वे येथील संपूर्ण नागरिकांचं आहे. अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

