भंडारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका लॉजवर मैत्रिणी सोबत शारीरिक सबंध बनवताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवन केल्याने एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची भंडारा पोलिसांनी नोंद केली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
गोंदिया येथील एक तरुणी व नागपुर जिल्हातील एक तरुण एकमेकाशी प्रेम करत होते. त्यात त्यांनी भेटायचं ठरवल. मग ते दोघेही भंडाऱ्यात भेटले आणि रात्र एकत्र घालवण्यासाठी एका लॉजवर आसरा घेतला. यानंतर दोघात शारीरिक सबंध बनवण्याच्या उद्देशाने या तरुणाने शक्तिवर्धक ‘वायग्रा गोळ्यांचं अतिसेवन केले होते. यानंतर युवकाचा रक्तदाब वाढल्याने हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. मृत युवक 27 वर्षीय असून तो नागपूर जिल्ह्यातील आहे. तर, त्याची मैत्रीण 23 वर्षीय असून ती गोंदिया जिल्ह्यातील आहे.
या दोघा प्रेमी युगुलानी एकमेकांची आयुष्यभर साथ द्यायचे आणि लग्न करायचे अशा आणाभाका घातल्या होत्या. त्यामुळे एकदा भेटायचे असे दोघांनीही ठरवले होते. युवक नागपूर येथून तर युवती गोंदियातून भंडाऱ्यात पोहचली होती. युवक आणि युवती दिवसभर भंडाऱ्यात सोबत फिरले. खरेदी केली आणि रात्र एकत्र घालवायची म्हणून दोघांनीही भंडारा येथील लॉजवर थांबले होते. यावेळी युवकाने मेडिकलमधून शक्तीवर्धक गोळ्या खरेदी केल्या. मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्याने गोळ्याचे सेवन केले. गोळ्यांचे अतिसेवन केल्याने तरुणाचा अचानक रक्तदाब वाढला आणि त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका झाल्याने युवकाचा मृत्यू झाला.
दरम्यान, मैत्रिणीने लॉजमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची भंडारा पोलिसांनी नोंद केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच युवकाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

