पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक, पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे:-मा.पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी उद्योगनगरी पिपंरी चिंचवड मध्ये असलेल्या शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेणारे तरुण व तरुणी, औद्योगीक परिसरामध्ये काम करणारा कामगारवर्ग तसेच हद्दीमध्ये असलेल्या बकालवस्ती, झोपडपट्टीमधील लहान मुले, तरुण हे अंमली पदार्थाचे विळख्यामध्ये पडु नयेत करीता जनजागृती करणे व कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे.मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे स्वप्ना गोरे, मा सहा पोलीस आयुक्त, गुन्हे, सतीश माने, मा सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 1, बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षक प्रशांंत महाले, पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, राजन महाडीक व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार प्रदिप शेलार व अशोक गारगोटे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, म्हाळुगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मौजे म्हाळुंगे गावातील स्माशानभुमीचे जवळ अविनाश पानसरे यांचे गोडाऊनमध्ये काहि इसमांनी अवैध अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/डुडा) हा अंमली पदार्थाची विक्री करीता साठवणुक केली असुन ते विक्री करीता पॅकिंग करीत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठांचे परवानगीने बातमीचे ठिकाणी छापा कारवाई करीता वपोनि संतोष पाटील, सपोनि प्रशांत महाले, पोउपनि राजन महाडीक, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व अंमलदार यांची पथके तयार करुन छापा कारवाईबाबत सुचना देवुन बातमीचे ठिकाणी जावुन पाहणी करुन गोडाऊनला चारही बाजुने दबा धरुन थांबलो असता तेथे घरगुती गॅस सिलेंडरने भरलेली एक टाटा एस हि चारचाकी गोडाऊनचे दिशेने जाताना दिसली. तीस सोबतचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने ताब्यात घेवुन वाहन चालकास नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव 1) राकेश जिवनराम बिष्णोई वय 24 वर्षे रा. कारवा हॉटेलमागे काळे यांचे बिल्डींगमध्ये म्हाळुंगे ता.खेड जि.पुणे मुळगाव करसंकला ता. बाप जि. जोधपुर राज्य राजस्थान असे असल्याचे सांगितले. त्याचेसह वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये एचपी गॅसचे भरलेले 32 घरगुती गॅस सिलेंडर व पांढरे रंगाचे नायलॉनचे पोत्यामध्ये 3 किलो अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/डुडा) मिळुन आला. त्याबाबत त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने समोर असलेल्या अविनाश पानसरे याचे गोडाऊन मध्ये त्याचे इतर 02 साथिदार असल्याचे सांगुन ते अफुचा चुराची (पॉपी स्ट्रॉ/डुडा) साठवणुक करुन विक्रीकरीता पॅकिंग करीत असल्याचे व घरगुती गॅस सिलेंडर मधुन व्यावसायिक गॅस सिलेंंडरमध्ये गॅस रिफिलींग करीत असल्याचे सांगितले.त्यास वाहनासह ताब्यात घेवुन लागलीच गोडाऊनमध्ये छापा टाकला असता दोन इसम मिळुन आले त्यापैकी एक इसम घरगुती गॅस सिलेंडर मधुन व्यावसायीक गॅस सिलेंडरमध्ये गॅस रिफिलींग करताना व दुसरा इसम काळे रंगाची नायलॉनची पोते झाकुन ठेवताना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे 2) कैलास जोराराम बिष्णोई वय 23 वर्षे रा. कारवा हॉटेलच्या मागे काळे यांचे बिल्डींगमध्ये म्हाळुंगे ता.खेड जि.पुणे मुळगाव जंबा किडानी ता.बाप जि.जोधपुर 3) मुकेश गिरधारीराम बिष्णोई वय 23 वर्षे रा. कारवा हॉटेलच्या मागे काळे यांचे बिल्डींगमध्ये म्हाळुंगे ता.खेड जि.पुणे मुळ गाव नोकीडा चारनाना ता.फलोदी जि जोधपुर राज्य राजस्थान अशी असल्याचे सांगितले. सदर गोडाऊनची पाहणी केली असता गोडाऊनमध्ये 03 काळे रंगाची नायलॉनची पोती त्यामध्ये अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/डुडा), एक लाल पांढरे रंगाचा मिक्सर व त्याची भांडी, वजनकाटा, एचपी कंपनीचे निळे रंगाचे व्यवसायिक सिलेंडर व लाल रंगाचे घरगुती गॅसचे एकुण 50 सिलेंडर मिळुन आले. इसम नामे 1) राकेश जिवनराम बिष्णोई, 2) कैलास जोराराम बिष्णोई व 3) मुकेश गिरधारीराम बिष्णोई याचंेकडुन एकुण 16,70,122/- रु. किंमतीचे एकुण 04 पोत्यांमध्ये एकुण 58 किलो 288 ग्रॅम अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/ डुडा) हा अंमली पदार्थ (किंमत 8,74,320/-), एक टाटा फोरव्हिलर टेम्पो (किंमत 5,00,000/-), 04 मोबाईल (किंमत 1,05,000/-), 82 गॅस सिलेंडर (किंमत 1,67,552), 01 वजनकाटा, 01 मिक्सर, रिफलिंग पाईप, सिलिंग पॅकींग रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी नामे 1) राकेश जिवनराम बिष्णोई, 2) कैलास जोराराम बिष्णोई व 3) मुकेश गिरधारीराम बिष्णोई यांचेकडे मिळुन आलेला अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/ डुडा) हा त्यांनी पाहिजे आरोपी 4) अनिलकुमार जाट रा. भेटजोन्डी राज्यस्थान यांचेकडुन आणला असल्याने, अ.क्र. 1 ते 3 यांनी धोकादायकरित्या घरगुती वापराचे सिलेंडर मधुन व्यवसायिक गॅस सिलेंडरमध्ये लोकांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण होईल हे माहित असुन सुध्दा गॅस सारख्या ज्वालाग्रही पदार्थाबाबत निष्काळजीपणाचे कृत्य करुन गॅस विक्रीचा व रिफलिंगचा कोणताही शासकीय परवाना नसताना, त्याचे ताब्यातील घरगुती वापराच्या गॅससिलेंडर मधुन दुसया व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या टाकीमध्ये गॅस रिफलिंग करताना गोडाऊनमध्ये मिळुन आले पाहिजे आरोपी 5) अविनाश पानसरे रा. म्हाळुंगे ता.खेड जि.पुणे याने कोणताही भाडेकरार न करता अ.क्र. 1 ते 3 यांना गॅस रिफलिंगसाठी व अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/ डुडा) विक्रीसाठी गोडावुन भाड¬ाने दिले असल्याने त्यांचेविरुध्द म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 15(क), व 29, व भा.दं.वि.कलम 420, 285, 188, 34 सह जिवनावश्यक वस्तु कायदा कलम 1955 कलम 3, 7 एलपीजी (पुरवठा आणि वितरण नियम) आदेश 2000 चे कलम 3,4,5,6,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत असुन अ.क्र. 1 ते 3 यांना दि 28/08/2023 रोजीपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहेत.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त,पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा.डॉ.संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. सतीश माने, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. बाळासाहेब कोपनर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 1 यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उप निरीक्षक राजन महाडीक, ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, अशोक गारगोटे, बाळासाहेब सुर्यवंशी, मयुर वाडकर, संतोष भालेराव,दादा धस, अजित कुटे, रणधीर माने, मितेश यादव, पांडुरंग फुंदे, बाळु कोकाटे यांचे पथकाने केली आहे.

