संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- गुमथळा येथील हल्दीराम फैक्ट्री विरोधात कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुरेशभाऊ भोयर तसेच जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या वर हल्दीराम कं. चे HR गुप्ता यांनी 5 लाख रुपयांच्या खंडणी चे आरोप लावल्याने तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने आज कांग्रेस चांगलीच आक्रामक झाली होती.
हल्दीराम कं. च्या फैक्ट्री समोर जोरदार नारेबाजी करीत HR गुप्ता ने माफी मागावी अन्यथा आम्ही चक्का जाम करु अशी भुमिका आंदोलन कर्त्यांनी घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी भटकर आणि पोलीस निरीक्षक नगराळे यांच्या मध्यस्तीने हल्दीराम फैक्ट्री चे मालक यांनी झालेल्या प्रकाराबद्दल स्वतः पुढे येत माफी मागितल्याने तुर्तास हे प्रकरण मिटले.
आजच्या आंदोलनात कांग्रेस नेता सुरेश भोयर, जि. प. सदस्य दिनेश ढोले, अनिकेत शहाणे, दिशा चनकापुरे, दिलीप वंजारी, तसेच इतर सरपंच व शेकडो कार्यकर्ता सहभागी झाले होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

