पंकेश जाधव पुणे ब्युरो चीफ 7020794626
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यात विद्युत वितरण महामंडळाच्या एक लाचखोर अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ लाच घेताना बेड्या ठोकल्या आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण विद्युत वितरण महामंडळ विभागात एकच खळबळ माजली आहे.
सरकारी विद्युत ठेकेदाराकडून 50 हजार रुपये लाच स्वीकारताना पुण्यातील महावितरण कार्यालयाच्या बाणेर उपकेंद्रातील सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. रविंद्र नानासाहेब कानडे वय 37 वर्ष असे लाचखीर अधिकाऱ्याचे नाव असून पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.1) महावितरण कार्यालय उपकेंद्र बाणेर येथील कर्यालयाच्या आवारात केली.
प्राप्त माहितीनुसार, याबाबत एका ठेकेदाराने पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. त्यात म्हटल होती की, तक्रारदार हे सरकारी विद्युत ठेकेदार आहेत. त्यांना आरएमसी प्लांटसाठी लागणाऱ्या विद्युत पुरवठा करण्याचा ठेका मिळाला होता. हे काम शासकीय योजना 1.3 टक्के तत्वाच्या नियमानुसार पूर्ण केले आहे. या कामाचा पुर्णत्वाचा दाखला देण्यासाठी उपकेंद्र बाणेर कार्यालयातील सहायक अभियंता रविंद्र कानडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी याबाबत पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात लाचखोर कानडे यांच्या विरोधात तक्रार केली. तक्रार अर्ज प्राप्त होताच शहनिशा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 28, 29 आणि 31 ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता तक्रारदार यांनी नियमानुसार पूर्ण केलेल्या कामाचा पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी लाचखोर कानडे यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने शुक्रवारी उपकेंद्र बाणेर कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना रविंद्र कानडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

