Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कोंढवा परिसरातील अक्षय अशोक लोणारे (टोळी प्रमुख)व त्याचे टोळी मधील इतर ०२ सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 2, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कोंढवा परिसरातील अक्षय अशोक लोणारे (टोळी प्रमुख)व त्याचे टोळी मधील इतर ०२ सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ०९/०६/२०२३ रोजी फिर्यादी हे राहत्या घरी असताना त्यांचा मुलगा आकाश यास त्याचे मित्र हे जखमी अवस्थेत घरी घेऊन आले. आकाश घरी आला तेव्हा त्याचे अंगावरचा टी-शर्ट हा पुर्णपणे रक्ताने भरलेला होता. तसेच त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. तेव्हा फिर्यादी यांनी आकाशला काय झाले याबाबत विचारले असता त्याने सांगितले की, कोंढवा खुर्द येथील बधे चौकात सिमेंटच्या कट्टयावर मी मित्रांसोबत बसलेलो असताना अचानक तेथे माझ्या ओळखीचे अक्षय लोणारे, अनिकेत देशपांडे व दिनेश घाडगे हे आले. त्यावेळी त्यांचे कडे लाकडी दांडके होते. त्यांनी मला पार्टीसाठी पैसे दे, नाहीतर तुला सोडणार नाही. मी पैसे देण्यास नकार दिला म्हणुन त्याचा राग आल्याने त्यांनी मला हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली म्हणून फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि नं. ५९२ / २०२३ भा.द.वि कलम ३०७, ३२३, ५०४,३४, क्रिमीनल अमेंटमेंट अॅक्ट ७, महा. पो. अधि. कलम १९५१ क. ३७ ( १ ) सह १३५ कलम वाढ महा.पो.अधि. कलम १४२ हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) अक्षय अशोक लोणारे वय २८ वर्षे रा. भिमनगर कोंढवा खुर्द पुणे (टोळी प्रमुख) २) अनिकेत राजु देशपांडे वय २३ वर्षे रा. चामुंडा ज्वलेर्स चे पाठामागे कोंढवा पुणे (टोळी सदस्य) ३) दिनेश रामदास घाडगे वय २२ वर्षे रा. पारगे चौक भैरवनाथ मंदिराचे जवळ कोंढवा बुा पुणे (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.

नमुद आरोपी टोळी प्रमुख १) अक्षय अशोक लोणारे (टोळी प्रमुख) याने त्याचे साथीदारांसह संघटित गुन्हेगारी टोळी तयारी केली असुन त्याचे वर कोंढवा पोलिस स्टेशन येथे एकूण १२ गुन्हे दाखल असुन सदर टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती साठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवून किंवा धाकदपटशा दाखवून किंवा जुलूम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून, संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार करून, स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरीता त्यांनी संघटितपणे व वैयक्तीकपणे खुनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी करणे, घरफोडी करणे बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणे, लुटमार करणे लोकांना दमदाटी करणे यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत, त्यांचेवर शरीरा विरुध्दचे व माला विरुध्दचे गुन्हे दाखल असून, त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम कलम ३ (१) (ii).३(२) ३(४) वा प्रमाणे कलम वाढविण्यासाठी व मान्यता मिळणे बाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे श्री. संतोष सोनवणे यांनी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०५ पुणे श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने मा. अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता..

सदर प्रकरणी छाननी करून कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि नं. ५९२ / २०२३ भा.द.वि कलम ३०७, ३२३, ५०४,३४, क्रिमीनल अमेंटमेंट अॅक्ट ७ महा.पो.अधि. कलम १९५१ क ३७ ( १ ) सह १३५ कलम वाढ महा.पो.अधि. कलम १४२ या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३(४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची

मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री शाहुराजे साळवे हे करीत आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५. श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग विभाग श्री शाहुराजे साळवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे श्री. संतोष सोनवणे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. संदीप भोसले,. श्री संजय मोगले पोलीस उप निरीक्षक, समाधान मचाले पोलीस अंमलदार, जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, नितीन चव्हाण, हनुमंत रुपनवर यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्राणांवर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे कारणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ५६ वी कारवाई आहे.

Previous Post

मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्जचा हिंगणघाट येथे शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन.

Next Post

मराठा आरक्षण आंदोलकावर लाठीचार्ज करून अमानुष मारहाण, सेलूत वंचित बहुजन आघाडी तर्फे निषेध.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मराठा आरक्षण आंदोलकावर लाठीचार्ज करून अमानुष मारहाण, सेलूत वंचित बहुजन आघाडी तर्फे निषेध.

मराठा आरक्षण आंदोलकावर लाठीचार्ज करून अमानुष मारहाण, सेलूत वंचित बहुजन आघाडी तर्फे निषेध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In