महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दिल्ली:- देशात महिला अत्याचाराचा घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे देशातील लहान मुली ते वृद्ध महिला सुरक्षित आहे की नाही हे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. अशी एक खळबळजनक घटना दिल्ली येथून समोर आली आहे. दिल्लीतील एका 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिच्या बरोबर क्रूरता केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी एका 28 वर्षीय नराधम तरुणाला बेड्या ठोकल्या आहे.
दिल्लीतील नेताजी सुभाष प्लेसमध्ये राहणाऱ्या एका 85 वर्षीय वृद्ध महिला आपल्या घरात झोपलेली होती त्यावेळी 28 नराधमाने तिच्यावर प्रशवी बलात्कार केल्या. बलात्कार केल्यानंतर या नराधमाने तिचे ओठ ब्लेडने कापले. सध्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 28 वर्षीय आरोपी आकाशला अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे 4 वाजता ही महिला घरात झोपली होती. आरोपी आकाशने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला आणि तिला मारहाण केली. तसेच ब्लेडने तिचे ओठ कापले. महिलेच्या चेहऱ्यावर आणि प्रायव्हेट पार्टवर अनेक जखमा झाल्या आहेत.
घडलेल्या या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. याशिवाय त्यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची इतर माहिती महिला आयोगासोबत शेअर करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

