Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

नागपूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प मेळावा, संधीचे सोने करून दाखविण्यासाठी सज्ज व्हा: खा. प्रफुल पटेल याचा कार्यकर्त्याना सल्ला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 3, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
नागपूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प मेळावा, संधीचे सोने करून दाखविण्यासाठी सज्ज व्हा: खा. प्रफुल पटेल याचा कार्यकर्त्याना सल्ला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ नागपुर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- आघाडीमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेसला दुय्यम स्थानी ठेवले जात असे, आम्ही देखील मोठ्या मनाने ते स्वीकारत होतो. यामुळे आमचे कार्यकर्ते मागे पडायचे, ही खंत असायची. मात्र तो भूतकाळ समजून, सर्व काही विसरून, सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयातून संधी प्राप्त होणार आहे. या संधीचे सोने करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे मार्गदर्शन मा. खा. प्रफुल पटेल यांनी आज नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले.

मागील दोन महिन्यांमध्ये एक वेगळा विचार करण्याचा प्रसंग का आला? भूतकाळात पक्ष वाढीचे जे प्रसंग आले त्यात आम्ही वरचढ असूनही दुय्यम स्थान आम्हाला देण्यात आले. नेहमी आघाडी टिकवण्यासाठी आम्हाला माघार घ्यावी लागली. आम्ही पक्षाच्या वाढीसाठी, जनतेच्या हितासाठी व विकासासाठी आज जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आपल्या सर्वांच्या भल्यासाठी असून आम्ही कधीही छत्रपती शिवाजी महाराज, फुले- शाहू- आंबेडकर यांच्या विचारांशी तडजोड करणार नाही, याची ग्वाही मा. प्रफुल पटेल यांनी दिली.

नागपूर जिल्ह्यात व शहरात पक्ष वाढीसाठी आगामी काळात जास्तीत जास्त जागा घेऊन पक्षाचा विस्तार व संघटन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे गेले त्यांची चिंता न करता जे सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन विदर्भात पक्षाचा विस्तार व वाढीसाठी कार्यकर्त्यांना ताकतीने संधी देण्याचे काम करू, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.

या मेळाव्याला अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. धर्मरावबाबा आत्राम, आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार नाना पंचबुधे, ओबीसी सेल राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, माजी आमदार राजेंद्र जैन, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार, नागपूर शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, आभाताई पांडे, सुनिल फुंडे यांच्यासह पार्टीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

गडचिरोली: भाजप सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणण्या करिता, काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला आज पासून सुरुवात.

Next Post

आलापल्ली येते संघामित्रा बुद्ध विहार वर्षावास धम्म प्रवचन सोहळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आलापल्ली येते संघामित्रा बुद्ध विहार वर्षावास धम्म प्रवचन सोहळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

आलापल्ली येते संघामित्रा बुद्ध विहार वर्षावास धम्म प्रवचन सोहळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In