अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या शिंदे सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख चौक (पंचवटी चौक) येथे पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
सरसकट ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अंबड व गेवराई तालुक्यातील १२३ गावांनी मंगळवारी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी राज्य सरकारने ठोस आश्वासन दिले नव्हते. त्या कारणास्तव जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी शेकडो समर्थकांनी गर्दी केली. वाढलेली, गर्दी पाहून तसेच आंदोलकांच्या तब्येतीची स्थिती लक्षात घेता त्यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली मात्र, आंदोलकांनी नकार दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. लाठीमारात अनेक आंदोलक जबर जखमी झाले. त्यामुळे राज्यात विविध पक्षाकडून सत्ताधारी पक्षाचा निषेध करण्यात येत आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सरकारचा जोरदार निषेध करण्यात येत आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे पुतळे जाळून निषेध करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष सुरेश तायडे, जिल्हा महासचिव सागर भवते, राष्ट्रापाल वांनखडे, विजय डोंगरे, राज राऊत, अमर भगत, सुनील गायकवाड, सह कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

