उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली, दि. ३ सप्टेंबर:- वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा नांद्रे येथेनागरी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने गायरान अतिक्रमण काढून टाकने विषयी काढलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चामुळे महाराष्ट्र सरकारने गायरान अतिक्रमण हटवण्याचे ज्या नोटीसा नागरिकांना पाठविण्यात आल्या होत्या त्या मुंबईच्या मोर्चामुळे रद्द करण्यात आल्या व गायरान अतिक्रमण जे लोक ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या नावावर नोंद करणे कामी महाराष्ट्र शासनाने गाव कामगार तलाठी यांना तसा आदेश काढण्यात आला. या गायरान प्रश्न सोडवल्यामुळे नांद्रे ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा नागरी सत्कार करून त्यांना नागरिकांचे प्रश्न आपण सतत सोडवून मा. प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या कार्याला असेच पुढे नेत राहावे असे उद्गगार काढले तसेच गायरान प्रश्न निकाली काढल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले.

या सत्कार सोहळ्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत घाटे, सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, सांगली मनपा क्षेत्रअध्यक्ष आनंदसागर पुजारी, सांगली जिल्हा सचिव राजू मुलांनी, माथाडी संघटनेचे संजय कांबळे, नझिर झारी, स्वप्निल कांबळे, सतीश शिकलगार,विशाल धेंडे, परशराम कांबळे, ॲड. चारुलता कांबळे, प्रा. सचिन कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन किशोर आढाव, श्रीकांत ढाले, रतन तोडकर, मिलिंद कांबळे, संजय ढाले, प्रशिक काकडे आदीसह नांद्रे गावातील सर्व गायरान अतिक्रमण धारकांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

