आकाश पांचाळ पुणे शहर प्रतिनिधी
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा परिसरात ढोल- ताशा पथकात सरावासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रतिस्पर्धी टोळीला माहिती देत असल्याच्या संशयावरुन टोळक्याने 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याचे प्राथमिक तपासात चा खून ले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
साईराज लोणकर (वय-25 रा. कोंढवा खुर्द), ओंकार कापरे (वय-25 रा. कोंढवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. लोणकर व कापरे हे सराईत गुन्हेगार आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती मुलगा कोंढवा येथील शिवनेरी या भागात राहतो.शनिवारी (दि. 2) रात्री तो ढोल-ताशा पथकात (शिवनेरी ट्रस्ट)सरावसाठी गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी न आल्याने रवि त्याच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार कोंढवा पोलिसांत दिली.पोलिसांनी मुलगा अल्पवयीन असल्याने तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. दरम्यान अल्पवयीन मुलासोबत गेलेला आणखी एकजण बेपत्ता झाला असून, तो घरी आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्याच्या पायाला जखमा झाल्या होत्या. अल्पवयीन मुलाचे लोणकर आणि कापरे यांनीअपहरण करुन त्याला सासवड येथे नेले. त्याठिकाणी त्याला बेदम मारह जखमी केले. मारहाणीमध्ये गंभीर मुलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करुन कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तसेच त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदार ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले करीत आहे….

