पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शहरातून प्रशासनाच्या घोर चुकीमुळे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपुर शहरातील पारडी फ्लाईओवर उडान फुलाचे निर्माण कार्य सुरू असताना एक खळबळजनक अपघात घडला. त्यामुळे उडान फुलाचे निर्माण कार्य करणाऱ्या कंपनी आणि प्रशासनावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागपुर शहरातील पारडी फ्लाईओवर उडान फुलाचे निर्माण कार्य असताना खालच्या बाजूला दुचाकीने जात असलेले एका कामगाराच्या 3 वर्षीय चिमुकली मुलाच्या डोक्यात लोखंडी सलाख घुसली. त्यामुळे हे 3 वर्षीय मुलाच्या डोक्यात गंभीर मार लागला आहे. या मुलाला तडकाफडकी जवळच्या रुग्णालयात गंभीररित्या जखमी हालत मध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार शुरू असून तो जीवन मरण्याला झुंज देत आहे.
दिनेश परधी हे कामगार असून ते मिनी माता नगर येथे आपल्या कुटुंबा बरोबर राहतात. मंगलवारला दिनेश हा आपल्या पत्नी आणि आपल्या 3 वर्षीय मूला बरोबर पारडी मोक्ष घाट रोड वरुन घरी जात असताना फ्लाईओवर ब्रिजचे निर्माण कार्य शुरू असताना एक लोखंडी रॉड वरुन खाली कोसळली त्यात चावीक वय 3 वर्ष यांचा डोक्याच्या मागचा बाजूला लागली. त्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला. याची माहिती स्थानिक पोलिसांना प्राप्त होताच पोलीस स्टेशन प्रभारी घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षामध्ये चूक करण्याऱ्या विरोधात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला.
या अगोदर पण येथे पुल कोसळल्याचे प्रकार झाले आहे. पुल बनविणाऱ्या कंपन्या कुठलीही सुरक्षेची तजवीज न घेता निर्माण कार्य करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हे प्रॉजेक्ट सुरू असताना सुरक्षेच्या नावावर फक्त मजाक बानावल्याचे दिसुन येते. शासन प्रशासन द्वारा ऑरेज सिटी ही विकास कार्य हे लोकानां समस्या आणि त्रास देत असल्याचे दिसते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

