Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या दोन बछड्यांचा भुकेने व्याकूळ होऊन दुर्दैवी मृत्यू, एक गंभीर बछड्यावर उपचार सुरू

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 8, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या दोन बछड्यांचा भुकेने व्याकूळ होऊन दुर्दैवी मृत्यू, एक गंभीर बछड्यावर उपचार सुरू
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्हातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपविभागातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे भुकेने व्याकूळ झालेल्या वाघाच्या दोन बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक बछडा गंभीर आहे. ही घटना गुरुवारी समोर आली. त्यामुळे वाघ बचाव मोहिमेला मोठी चपराक बसली आहे. त्यात एका गंभीर असलेल्या बछड्यावर वनविभागाकडून उपचार सुरू आहेत.

कळमना परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५७२ मध्ये गुरुवारी वनविभागाचे काही कर्मचारी गस्तीवर होते. या कर्मचाऱ्यांना वाघाचा एक अपंग बछडा दिसला. कर्मचाऱ्यांनी तत्काळ या बछड्याची सुटका करून प्राथमिक उपचारासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव उपचार केंद्रात पाठवले. त्यानंतर त्या ठिकाणी अधिक शोध घेतला असता काही अंतरावर वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले.

या तिन्ही बछड्यांची आई वाघीण मागील काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने भुकेने व्याकूळ झाल्याने या वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वनविभागाने ताब्यात घेतलेल्या तिसऱ्या बछड्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर वनविभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार सुरू आहेत.

बछड्यांची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही बछड्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. शवविच्छेदन करणाऱ्या टीममध्ये डॉ. कुंदन पोडचेलवार आणि डॉ. दिलीप जांभुळे यांचा समावेश होता. या घटनेच्या अनुषंगाने वनविभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

अखेर सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मध्यस्थीने प्रविण तेलगोटे यांचे उपोषण मागे.

Next Post

वर्धा जिल्हात भाजपात आमदार व माजी खासदार यांचा वाद पेटला, हे करणार आत्मक्लेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हात भाजपात आमदार व माजी खासदार यांचा वाद पेटला, हे करणार आत्मक्लेश.

वर्धा जिल्हात भाजपात आमदार व माजी खासदार यांचा वाद पेटला, हे करणार आत्मक्लेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In