श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. जालना जिल्हात मराठा समाजाच्या आरक्षणसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे संपूर्ण राज्यात मराठा आरक्षण संघर्ष पेटला आहे. ठीक ठिकाणी आंदोलने सुरू आहे.
बीड जिल्ह्यातील जातेगाव येथे आरक्षण मिळावे म्हणून अनेक नागरिक उपोषणाला बसले आहे. त्या आंदोलनात पती-पत्नी सहभागी झाले होते. हे दांपत्य अचानक घरी गेले. यानंतर त्यांनी घरात गळफास लावून आपल्या आयुष्याचा अंत केला. राजु बंडू चव्हाण वय 31 वर्ष आणि सोनाली राजु चव्हाण वय 28 वर्ष असे मृत पती पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
राजु बंडू चव्हाण व सोनाली राजु चव्हाण हे पती पत्नीचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील जातेगाव या ठिकाणी राहतात. सध्या जातेगाव येथे मराठा आरक्षणा संदर्भात उपोषण सुरू आहे. या आंदोलनात राजु चव्हाण हे सहभागी झाले होते. काही वेळानंतर राजू यांच्या मनात अचानक काहीतरी आले आणि त्यांनी उपोषणस्थळापासून पंधरा फुटाच्या अंतरावर असलेल्या आपल्या घरी जाऊन आपल्या पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. तलवाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

