संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ‘राजु धोटे’ तसेच काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच विनोद कुटे यांच्यासह शेकडो सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- समुद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी संघर्ष मेळाव्यात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ‘राजेश धोटे’ यांनी त्यांच्या शेकडो सहकाऱ्यासह केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश. तसेच काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच विनोदरावजी कुटे यांच्या सुद्धा शेकडो कार्यकर्तासह तर समाजसेविका सौ विद्याताई गिरी यांच्या अनेक महिलांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश.
समुद्रपुर येथे दिपाली मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेतकरी संघर्ष मेळाव्यात माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, तालुकाध्यक्ष महेश झोटिंग यांच्या नेतृत्वात विविध पक्षातील दिग्गज लोकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा झाला पक्षप्रवेश यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख व मान्यवरानी प्रत्येकांच्या गळ्यातमध्ये पक्षाचा दुप्पटा टाकून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन वर्धा जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी मजबूत करण्याचे धोरण पक्षाने आखले आहे.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ धोटे काँग्रेस चे माजी सरपंच विनोद कुटे तसेच समाजसेविका विद्याताई गिरी यांच्यासह तुषार भोयर, रंजीत भोंगळे, प्रमोद काळे, अशोक हजबे, मनोज खंडाळकर, निलेश तपासे, उमेश वानखेडे, समाजसेविका विद्याताई गिरी, सुनीता मेश्राम, संगीता नासरे, सोनूताई कलवडे, गीताताई मेश्राम, सविताताई मेथी, रामदास लेनगुरे,नामदेव जीगरे, किसनजी अवचट, रमेश पावणे, रामजी पाटील बबनराव मेश्राम, नारायण वैद्य, उमेश चिंचाळकर, संदीप ब्राह्मणे, विनायक राऊत, निलेश डावरी, बाबा मरूदे खुशाल ठवली, प्रशांत चौधरी, रवींद्र डांगे, श्रीकांत पडवे, प्रकाश इटणकर बाळकृष्ण अवचट, विनायक पुरुषोत्तम घोरपडे, बाबा वरफडे, लखन गिरडे, विनायक श्रीरामे आत्माराम गुरनुले, गजानन कुमरे, सचिन सोनवणे, संजय तुराळे, नितीन तुराळे, अशोक धोटे, कडू पारधे, देवराव तुराळे, यांच्यासह समुद्रपुर तालुक्यातील शेकडो लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश केला.
यावेळी जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, युवा नेते समीर देशमुख तालुका अध्यक्ष महेश झोटींग, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष, प्रलय तेलंग, गजानन शेंडे, अशोक वांदिले संचालक कृ.उ.बा. समिती समुद्रपुर, दिनकरराव घोरपडे, अशोकजी डगवार, बबनरावजी हिंगणीकर, प्राचार्य अशोक कलोडे, अशोक कलोडे, गणेश वैरागडे ,ज्योती देशमुख जिल्हाध्यक्ष महिला, युवक जिल्हाध्यक्ष संदीप किटे, युवक कार्याध्यक्ष सचिन पारसडे, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, रवींद्र झाडे, सोनू मेश्राम, संतोष तिमांडे, विनोद कुटे, गुरुदयालसिंग, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, दशरथ ठाकरे, सुरेश भगत, राष्ट्रपाल कांबळे, संदीप झाडे, अनिल देशमुख, अनिल आडकीने, जावेद मिर्झा, सुभाष चौधरी, गोकुळ टिपले प्रामुख्याने उपस्थित होते.

